राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-सर्वसामान्य व्यावसायिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाने अस्तगावमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ग्रामीण भागातील आर्थिक घडामोडींना गती देणारा आणि अनेक तरुणांसाठी रोजगाराचे उपक्रम हा ठरणार आहे.या प्रसंगी गाळेधारकांच्यावतीने डॉ. विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ज्ञानदेव पाटील, नंदू भाऊ, संतोष गोरडे, नंदकुमार जेजुरकर, माजी सरपंच सुळके ताई, नवनाथ शिंदे, संतोष कोटे, कोंडेकर, गोरडे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, हे व्यापारी संकुल केवळ एक इमारत न राहता, स्थानिक व्यापार आणि रोजगाराला चालना देणारे एक गतिशील केंद्र ठरेल. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सामान्य माणसासाठी हा प्रकल्प खुला राहील. आम्ही संपूर्ण प्रामाणिकपणे विकासासाठी कटिबद्ध आहोत.
पुढे बोलताना त्यांनी गोदावरी कालव्याचे काम पूर्णत्वास येत असून तसेच प्रलंबित पाणीपुरवठा योजना, शिर्डी व पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास, तसेच साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ स्थापनेबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला तसेच. “ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या शक्य करून दाखवण्यातच आमची ओळख आहे,असे ते ठामपणे सांगितले