23.7 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

हरेगाव येथील फरसाण दुकानाला भीषण आग ,लाखोंचे नुकसान 

 

हरेगाव (जनता आवाज वृत्तसेवा): – येथील हरेगाव उंदीरगाव रस्त्यावरील चर्च गेट आउट साईड परिसरातील कपिले फरसाण या दुकानाला आज मंगळवार पहाटे ४ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

संतोष कपिले यांच्या मालकीचे दुकान फरसाणाचे दुकान असून पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानातील फर्निचर ,तयार केलेला खारा व गोड माल सह फ्रीज ,दुचाकी आगीच्या भक्ष स्थानी पडले आहे.पहाटेच्या सुमारास फिरण्यास निघालेल्या नागरिकाच्या निदर्शनास सदर घटना आली.त्यांनी तातडीने दुकान मालकास खबर देऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला . आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास पाचरण करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!