शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा): – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांचे स्वागत केलें. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने आदी उपस्थित होते.
शिर्डी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगांव शनि (ता. वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) येथील योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याकडे प्रस्थान झाले.