20.3 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार : आ. हेमंत ओगले टाकळीभान टेलटॅंकचे आ. ओगले यांच्या हस्ते जलपूजन

श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):-  टाकळीभान टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे . श्रीरामपूर तालुक्याच्या टाकळीभान व परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटॅंकचे शासकीय जलपूजन आ. ओगले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कमी पर्जन्य हा चिंतेचा विषय असून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे टाकळीभान टेलटॅंक पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार असल्याचे म्हटले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की, पाट चाऱ्या दुरुस्त करणे आवश्यक असून आमदार हेमंत ओगले यांनी पाट चाऱ्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे सांगीतले.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सोसायटीचे चेअरमन मांजाबापू थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास दाभाडे, भारत भवार, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय कल्हापुरे, बाबासाहेब तनपुरे, ऍड प्रमोद वलटे, एकनाथ पटारे, तुकाराम बोडके, सोमनाथ पाबळे, काकासाहेब रणनवरे, गाधे काका, अनिल माने, दिलीप पवार, केरू बापू मगर, कापसे सर, रोहिदास बोडखे, दयानंद रणनवरे, गोटीराम दाभाडे, विकास मगर, शाखा अभियंता मारवाडी, शेख, कालवा निरीक्षक तनपुरे, बाळासाहेब कोकणे, गाडेकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!