पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गण रचनेत पारनेर तालुक्यातील ५ गावांच्या झालेल्या दुसऱ्या गटातील समावेशाबाबत ५ हरकती दाखल करण्यात आल्या असून त्याची सुनावणी आज नाशिक येथे महसूल विभागीय आयुक्त यांच्या समोर दुपारी होत असल्याने त्याकडे संपूर्ण पारनेर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .
या आधीच्या निघोज पंचायत समितीच्या गणातील वडनेर बुद्रूक हे अळकुटी गणात समाविष्ट केले , अळकुटी पंचायत समितीच्या गणातील दरोडी गाव कान्हुर पठार पंचायत समितीच्या गणात समाविष्ट केले , जवळा गणातील पठारवाडी हे निघोज पंचायत समितीच्या गणात समाविष्ट केले , तर सुपा पंचायत समितीच्या गणातील शहांजापूर हे ढवळपुरी पंचायत समितीच्या गणात समाविष्ट केल्याने अनेकांनी या फोडाफोडीला विरोध केला आहे , त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी विभागीय महसूल आयुक्तांनी आज शुक्रवारी कागदपत्रांसह नाशिक येथे संबंधितां ना बोलवले आहे .
निघोज पंचायत समिती गणाची लोकसंख्या २६ हजार २९८ असून वडनेर बुद्रूक ची ३ हजार ९६ मिळून २९ हजार ३९४ होत आहे , याच पद्धतीने मागील निवडणूका होत आल्या आहेत , पण यावेळी वडनेर बुद्रूक ला अळकुटी त सामील केल्याने अळकुटी ची मतदार संख्या २८ हजार २६९ असून त्यात वडनेर बुद्रूक ची ३ हजार ९६ अशी २५ हजार १७३ होते , त्यात दरोडी ची १ हजार ७४२ मिळून २६ हजार ९१५ होत आहे . तर या आधी जवळा गणात असलेले पठारवाडी ची संख्या १ हजार ८६७ असून हे गाव या वेळी निघोज गणात समाविष्ट करण्यात आल्याने मतदार संख्या २७ हजार ५२७ होत आहे , जर पठारवाडी जवळा गणातील २३ हजार ४९२ मतदार संघात सामील केल्याने २५ हजार ३६० होत आहे .
अळकुटी गणाची २७ हजार ५७३ संख्या असलेले कान्हुर पठार पंचायत समिती गणात १ हजार ७४२ संख्येची दरोडी सामावल्या ने २५ हजार ८३१ मतदार संख्या होत आहे . या चुकीच्या पद्धतीने गावांची झालेली फोडाफोडी मुळे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत . पुर्वीच्या पद्धतीने वडनेर बुद्रूक , निघोज मध्ये , दरोडी , अळकुटी मध्ये , पठारवाडी जवळा गणात समाविष्ट होण्याची काळाची गरज आहे , हीच कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे .
असे बदल केले , तर पारनेर तालुक्यातील पंचायत समिती गणांच्या लोकसंख्येत समानता येऊन
कर्जुले हर्या गण क्रमांक ११३ , ग्रामपंचायती १२ , समाविष्ट गावे १३ , लोकसंख्या २३ हजार ९२० , अनुसूचित जाती लोकसंख्या १ हजार १३३ , तर जमाती ३ हजार ४५ , टाकळी ढोकेश्वर ११४ , ग्रामपंचायती १० , गावे ११ , लोकसंख्या २६ हजार ८६३ , जाती १ हजार ९०३ , जमाती २ हजार ८९७ , ढवळपुरी ११५ , ग्रामपंचायती ६ , गावे ९ , लोकसंख्या २५ हजार ४९६ , जाती १ हजार ६५८ , जमाती ५ हजार ७९४ , भाळवणी ११६ , ग्रामपंचायती १२ , गावे १२ , लोकसंख्या २५ हजार ८६८ , जाती १ हजार ९८५ , जमाती ९८४ , कान्हुर पठार ११७ , ग्रामपंचायती १६ , गावे १८ , लोकसंख्या २७ हजार ५७३ , जाती १ ४७१ , जमाती ७६१ , जवळा ११८ , ग्रामपंचायती १० , गावे १० , लोकसंख्या २३ हजार ४९२ , जाती १ हजार ७८६ , जमाती ५८३ , अळकुटी ११९ , ग्रामपंचायती १३ , गावे १३ , लोकसंख्या २८ हजार २६९ , जाती १ हजार ६२२ , जमाती ५८३ , निघोज ग्रामपंचायती ६ , गावे १३ , लोकसंख्या २६ हजार २९८ , जाती १ हजार ६३० , जमाती १०२३ , वाडेगव्हाण १२१ , ग्रामपंचायती १७ , गावे १९ , लोकसंख्या २६ हजार ५९४ , जाती २ हजार ६७८ , जमाती ५६० , सुपा १२२ ग्रामपंचायती १२ , गावे १२ , लोकसंख्या २६ हजार ६७५ , जाती २ हजार ४०५ , जमाती ६९४ आहेत .
पारनेर तालुक्यात पंचायत समितीचे १० गण , ११४ ग्रामपंचायती , १३० गावे , एकूण लोकसंख्या २ लाख ६१ हजार ४८ , अनुसूचित जातींची लोकसंख्या १८ हजार २७१ , अनुसूचित जमातींची लोकसंख्या १६ हजार ९२४ आहे .