श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नव्याने चालू झालेल्या पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदारवृत्तसेवाले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदर पत्रात नमूद केले आहे की, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, नेवासा त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील श्रीक्षेत्र सरला बेट, महानुभव पंथाचे कमालपूर, शीख धर्माचे डोमेगाव आणि हरेगाव येथील मत माऊली या सर्व धर्मियांच्या उत्सवाकरिता देशभरातून हजारो भाविक येत असतात, या सगळ्या देवस्थानांना बेलापूर हेच मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. तसेच श्रीरामपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची प्रवासी संख्या देखील लक्षणीय आहे त्यामुळे पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास निश्चितच भाविकांबरोबरच प्रवाशांची देखील सोय होणार आहे त्यामुळे आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी आमदार ओगले यांनी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत आपण लवकरच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना आणि रवणीत सिंग यांची भेट घेणार असून पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस बरोबरच अजुन काही महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांना बेलापूर रेल्वे स्थानकात थांबा मिळणेकामी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.