19.2 C
New York
Saturday, August 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

पद्मभुषण डाॅ बाळासाहेब विखेंचे पाण्याचे स्वप्न पूर्ण, याचा सर्वाधिक आनंद डॉ. सुजय विखे पाटील

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक भागात पाणी पोहोचण्याचे पाहीलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे यश आज पाहायला मिळत असून, शिर्डी मतदार संघातील प्रत्येक गावात जलपूजन करण्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉ सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

राहाता तालुक्यातील मोरवाडी येथे निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार तसेच पेढा तुला करण्यात आली. डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमास वाल्मीक मोरे, संजय चोळके, सविता चोळके, सुनीता मोरे, मनीषा मोरे, निलेश मोरे, नंदू शेळके, मीनानाथ दरेकर, धोंडीराम मोरे, रायबली मोरे, राजेंद्र पठारे, संतोष गोरडे, नंदू गव्हाणे तसेच शासकीय अधिकारी, गावातील ग्रामस्थ आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रम रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवण्यात आल्याने गावातील बहिणींना डॉ. विखे पाटील यांनी राखीपर्वाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या राजकीय जीवनातील प्रारंभीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “2009 ते 2014 या काळात मोरवाडीत मतदान होत नव्हतं. पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इथल्या ग्रामस्थांचा निर्धार होता. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर चाळीस वर्षांनी या भागात पाणी आणण्यात यश आलं. याचे श्रेय स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला जातं.”

ते पुढे म्हणाले, निळवंड्याचं पाण्याचे”हे यश मिळवण्यात स्वर्गीय पिचड साहेब यांचे सहकार्य मोलाचे होतेच, पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून केलेव्या पाठपुराव्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘पहिले दहा किलोमीटर कालवा पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही’ असा ठाम निर्णय महायुती सरकारने घेतल्यामुळेच अशक्य वाटणारे काम शक्य केलं.

युवकांना संदेश देताना डॉ. विखे म्हणाले, माझं काम म्हणजे युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला योग्य दर मिळवून देणं. सत्ता आली-गेली तरी काम सुरू राहायला हवं. सर्वसामान्य लोकांचे आपण कामे केली पाहिजेत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना आपण प्रत्येक घरोघरी पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

मोरवाडी पंचक्रोशीतील गावांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून “पाणी आपल्या गावात कधी येईल का या प्रश्नाला उतर मिळाल आहे. 40 वर्षांची प्रतीक्षा संपली. मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी पंचक्रोशीतील गावांना पाणी आले. विखे परिवाराचे आम्ही कायम ऋणी राहू,” असा भावनिक उद्गार गावाच्या सरपंच सविता चोळके यांनी काढला.

विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “आम्ही पोरं-बाळं उत्तर देत नाही म्हणतात, पण आम्ही सूडबुद्धीने राजकारण करत नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा असा मिश्कील टोला बाळासाहेब थोरात यांना लगावला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!