20.7 C
New York
Saturday, August 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

विहिरीत उडी मारून तरुणीने लेकरांसहित जीवन यात्रा संपवली, नायगाव येथील धक्कादायक घटना!

जामखेड(जनता आवाज वृत्तसेवा):-रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे एका पंचवीस वर्षे विवाहित तरूणीने आपल्या दोन लेकरासहित विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.ही दुःखद घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायगाव येथील रूपाली उगले या विवाहित महिलेने आपल्या पोटच्या दोन लेकरांसहित घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे,या घटनेत पाण्यात बुडून रूपाली नाना उगले (वय 25 वर्ष) समर्थ नाना उगले (वय 5 वर्ष) चिऊ नाना उगले (वय 3 वर्ष )या तिघांचा मृत्यू झाला असून मयत चिमुकले शाळेच्या गणवेशात होती असे समजते आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत पोलिसांच्या फौजफाट्या सहित घटनास्थळी दाखल झाले आहेत.यावेळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

सदरची घटना आत्महत्या की घातपात आहे याचा खर्डा पोलीस कसून तपास करीत आहेत या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र पोलिसांच्या तपासानंतरच सदर घटनेबाबत सत्यपरिस्थिती काय आहे याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!