गुहा (जनता आवाज वृत्तसेवा):-आदेश प्रतिष्ठान गुहा यांच्यातर्फे प्रथमच श्रीक्षेत्र गुहा ते श्री क्षेत्र कानिफनाथ मढी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 7 वा श्रीक्षेत्र गुहा येथील कानिफनाथ उर्फ कन्होबा मंदिरापासून पायी दिंडी ला सुरुवात होणार आहे.
दिंडीचा मार्ग हा जोगेश्वरी आखाडा,गोटुंबा आखाडा,उंबरे मार्गे संध्याकाळी ब्राम्हणी येथील संत मलिका मंदिर येथे मुक्काम होणार असुन दुसऱ्या दिवशी सकाळी सोनई , माडेगव्हाणे मार्गे मिरी येथील शनी मंदिरात दिंडीचा दुसरा मुक्काम होणार आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी तिसगाव मार्गे दिंडी श्री क्षेत्र मढी येथे पोहोचेल. या मार्गात ठिकठिकाणी इच्छुक अन्नदात्यांमार्फत चहा पाणी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचे जेवण याचे यथोचित नियोजन करण्यात आले असल्याचे आदेश प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान ही दिंडी प्रथमच निघत असल्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नियमांचे पालन करीत मार्गस्थ होणार असुन दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी 501 रुपयाचे प्रवेश शुल्क ठेवण्यात आहे तरी इच्छुक भाविक भक्तांनी आदेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडे संपर्क करून आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.