28.2 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेवगाव येथील अकस्मात मृत्यू प्रकरणाचा उलगडा , दोन आरोपी ताब्यात

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-दि.०९ रोजी शेवगाव पोलिस ठाणे हद्दीतील ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर येथील ऊसाच्या शेतात अंदाजे २०-२२ वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृत्यू संशयास्पद असल्याने सदर प्रकरण शेवगाव पोस्टे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ९४/२०२५, भा. न्या. सु. सं. कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मयताची ओळख पटवून त्याचे नाव आकाश लक्ष्मण किडमिचे (वय २० वर्षे, रा. रामनगर, शेवगाव) असे निश्चित करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पोहेकॉ २१५९ हृदय घोडके, पोहेकॉ किशोर शिरसाठ, पोहेकॉ सागर ससाणे, पोहेकॉ प्रमोद जाधव व चासफो उमाकांत गावडे यांनी समांतर तपास करून,खालील आरोपींना ताब्यात घेतले .विजय चंदर किडमिचे (वय २० वर्षे)अरुण लाला उपदे (वय १९ वर्षे)(दोघे रा. रामनगर, शेवगाव, जि. अहिल्यानगर) शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून मयताचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.

दोन्ही आरोपींना दि. ९ रोजी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलबुर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि डॉ. बसवराज शिवपुजे, विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर (अतिरिक्त कार्यभार शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!