28.2 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

आश्वी बुद्रुक येथे २०० रुपयाच्या उसनवारीमुळे युवकांच्या मारामारीमध्ये युवकाचा मृत्यु

आश्वी(जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे २०० रूपये किरकोळ उसनवारी मुळे युवकांच्या मारा मारी मध्ये मतीन महेमुद शेख मृत्यु झाला असुन घडना घडलेल्या २४ तासाच्या आत आश्वी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व कर्मचाऱ्यांनी आरोपी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी बिलकिस उर्फ शाकीरा महेमुद शेख वय ५५ वर्ष रा उंबरीबाळापुर रोड,आश्वी बुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादे नुसार सविस्तर वृत्त असे की, मयत मुलगा मतीन महेमुद शेख याचा मित्र आरोपी नंबर १ आसीफ सलीम शेख रा.आश्वी बुद्रुक, यांना फोन करून सांगितले की, मतीन याचे पाठित खिळा लागला तुम्ही सगळे प्रवरा हॉस्पिटल लोणी ता.राहाता येथे या.फिर्यादी यांने दवाखान्यात गेल्यावर मतीन याला विचारले की, तुझ्या पाठीत खिळा कोणी भोकसला त्यावर मतीन यांनी सांगतले की,एरीगेशन बंगला प्रतापपुर रोड,आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर येथे बसलेलो असतांना आरोपी नं २,३,४ हे माझ्याशी झटपट करत होते. त्यांनी मतीन यांचे हातपाय पकडुन ठेवले होते तसेच उसनवारी दिलेले २०० रूपये मी व आरोपी नंबर १ च्या वडीलाकडे मागण्यासाठी गेल्याचा राग मनात धरूण आरोपी नंबर १ ने माला पाठीमध्ये खिळा भोकसुन जख्मी केले.

प्रवरा हॉस्पिटल लोणी तालुका राहाता येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टराच्या सल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील ससुन रूग्णालयात गेलो असता उपचारा दरम्यान दि ९ ऑगस्ट रोजी मतीन याचा मृत्यु झाला.याप्रकरणी फियार्दीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नंबर १-आसीफ सलीम शेख रा.आश्वी बुद्रुक, २. सोहेल आंधळे (पुर्ण नाव माहित नाही) रा.प्रतापपुर, ३. पप्पु भांड (पुर्ण नाव माहित नाही) रा.आश्वी बुद्रुक ४.गौतम गायकवाड, (पुर्ण नाव माहित नाही) रा.आश्वी बुद्रुक ता संगमनेर यांनी संगणमत करून जावे ठार मारून टाकले आहे.

अनेकदा आश्वी परीसरामध्ये अवैध्यत रित्या गांजा विक्री होत असल्याची कुरबुर होती. आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर परीसर,ताजणे मळा येथील के टी बंधरा आश्वी बुद्रुक तसेच आश्वी खुर्द कट्टा अनेकदा गंजा पिणारे असल्याचे काही स्थानिकांनी पोलीसांना सांगितले होते असे असतांना पोलीसाच्या बघ्याच्या भुमिकेमुळे अवैध्यगित्या दारू तसेच गांजा विक्रित्यावर राजकीय वरद हस्त असल्यामुळे पोलीस प्रशासन कोणते ही कारवाई करत नव्हते. जर या लोकांनावर कारवाई झाली असती तर आज मतीन वाजु शकला असता.गांजा तस्करी सोबतच आश्वी परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशीली प्रदार्थाचे विक्री होत असल्याचे दिसत आहे.पोलिसांनी तत्काळ अवैध्य रित्या दारू व गांजा तसेच आम्ली प्रदार्था विक्रेतावर करवाई करावी आशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

घटनास्थाळी रात्री उशीरा संगमनेर उपविभागिय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली. रात्री गुन्हा दाखत होत नसल्यामुळे संत्पत नातेवाईकांनी मृत मतीन यांची डेडबॉडी पोलीस ठाणे समोर आणून ठेवली होती.घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्डे करत आहे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!