28.2 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

आदिवासींसाठी हक्काचे घर आणि शिक्षणासाठी प्राधान्य देणार – डॉ. सुजय विखे पाटील रहीमपूर आदीवासी दिन उत्साहात संपन्न 

आश्वी (जनता आवाज वृत्तसेवा) :–विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासच्या मुख्य प्रवाहात येत आहे.आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्याकरीता हक्काचे घर शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रहीमपूर येथे भव्य मिरवणूक व आदिवासी एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भगवान वीर एकलव्य, बिरसा मुंडा आणि इतर महामानवांच्या प्रतिमांना वंदन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. हजारो आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि युवक-युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त राहिमपूर, तालुका संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार अमोल खताळ, अॅड. बापूसाहेब गुळवे, मारुती मेंगाळ, शांताराम शिंदे, सविताताई शिंदे, गणपतराव शिंदे, सरूनाथ उंबरकर, आशिष शेळके, विनोद सूर्यवंशी, अनिल बेर्डे, माऊली वर्पे, अरुण शिंदे, सचिन शिंदे, पप्पू गाडे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात आला. सत्कार स्वीकारून डॉ. विखे पाटील यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. परंतु अनेक दशके हा समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिला. अजूनही २६ गावांतील आदिवासी बांधव अतिक्रमणात व असुरक्षित ठिकाणी राहतात. पुढील एक वर्षात प्रत्येक गावात शिबिरे घेऊन त्यांना हक्काचे घरकुल, दर्जेदार शिक्षण आणि सरकारी योजना मिळवून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आपल्या युवकांनी शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करावी, हा माझा संकल्प आहे. पुढील पंचवीस वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्याचा कलेक्टर एखादा आदिवासी युवक होईल, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. गरीब जनतेचा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे, आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण आदिवासी समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू आशी ग्वाही दिली.

कार्यक्रमा दरम्यान डॉ. विखे पाटील यांनी आदिवासी युवकांना थेट आवाहन केले “तुम्ही माझ्याकडे नोकरीसाठी अर्ज करा, मी माझ्या घरातूनच सुरुवात करून तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन. आपल्या समाजातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो.”

यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले. आदिवासी बांधवांना सन्मान देण्याचे कार्य विखे परिवार करत असताना, आपले महायुती सरकारही आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!