लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- फुल शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठी संधी आहे फुल शेती करत असताना फुल शेतीचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत फुल शेतीची लागवड करा लागवडी बरोबरच मार्केटिंग आणि प्रक्रिया उद्योगही समजून घ्या असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
बाभळेश्वर (ता राहाता) येथे सी.एस.आय.आर- राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्था,लखनौ फ्लोरिकल्चर मिशन, अंतर्गत जनसेवा फौंडेशन लोणी आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झेंडू आणि शेवंती रोपांच्या वितरण कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी भारी लखनौ चे प्रधान शास्ञज्ञ डॉ. विजय वाघ,प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम,पायरेन्सचे सचिव संचालक डॉ. निलेश बनकर, प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशुमख, उद्यान विद्या,डॉ विलास घुले यांच्या सह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतक-याच्या पाठीशी राहील्याने शेतकरीभिमुख निर्णय होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सर्व समावेशक शेती धोरणामुळे आज सेंद्रीय शेती,बांबू मिशन,फळबाग लागवड यासारख्या योजनांमुळे शेतीला चालना मिळत आहे. फुलशेतीतून चांगले उत्पादन घेऊन आपली यशोगाथा निर्माण करा असेही सौ.विखे पाटील यांनी सांगत जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून महिलांचे केवळ बचत गटाबरोबरचं त्यांना सक्षमपणे उभं करण्याचं काम जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत महिलांच्या माध्यमातून मोठे संघटन जिल्ह्यामध्ये आहे. या माध्यमातून महिला या रोजगारभिमुख होत आहेत याचाही अभिमान मोठा आहे. या प्रशिक्षणातून महिलांनी टाकाऊ पासून टिकाऊ तंत्रज्ञान समजून घेत स्वयंपूर्ण व्हावे असेही सौ विखे पाटील यांनी सांगितले.
डॉ. विजय वाघ यांनी फ्लोरिकल्चर मिशन विषयी माहिती देतांना २३ राज्यात हे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. फुल शेतीला मोठी संधी आहे यापासून महिलांनी रोजगार निर्मिती सुरू करावी आज सुकलेल्या फुलांपासून आकर्षक वेगवेगळ्या वस्तूं बरोबरच आकर्षक अशा ज्वेलरी तयार केली जाते प्रशिक्षणाबरोबरच बाजारपेठही उपलब्ध करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याचा लाभ महिलांनी घेऊन पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केंद्राच्या विस्तार विभाग प्रमुख डॉ.प्रियंका खर्डे यांनी केले.