लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-खेळातूनही चांगले करिअर घडू शकते. जिद्दीने खेळा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत असताना खेळासही तेवढेच महत्त्व देत असतांना निरोगी राहण्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे दिले पाहिजे खेळाडू वृत्तीने जीवनाचा सामना करा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पोर्टस अकॅडमी आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षे मुली राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ चे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोढवळे,कॅम्प संचालक डाॅ.आर.ए.पवार यांच्या सह संस्थेचे सर्व क्रीडा शिक्षक तसेच खेळाडू यांच्या उपस्थित पार पडले . या स्पर्धेमध्ये नागपूर अमरावती लातूर छत्रपती संभाजी नगर नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर व क्रीडा प्रबोधनी अशा नऊ संघातील १४४ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
आज उपउपांत्य फेरीतील सामने तर गुरुवारी उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटनाचा सामना नाशिक विरुद्ध अमरावती या दोन विभागांमध्ये खेळण्यात आला यामध्ये अमरावती संघाने नाशिकचा ४=० असा पराभव केला. स्पर्धेकरिता अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनवणे अभय साळवे अतुल डे विल्यम राज जिरेमिया लूमट्राऊ हे काम पाहत आहेत.
यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच खेळालाही विशेष महत्त्व दिले जाते. प्रवरा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून खेळासाठी विशेष सुविधा प्रवरेमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हे सुरू आहे त्यामुळे प्रवराच्या विद्यार्थी आणि अहिल्यानगरचा विद्यार्थी हा खेळामध्ये राज्य आणि देश पातळीवर देखील पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा अधिकारीज्ञानेश्वर खुरंगे यांनी खेळास महत्व दिले पाहिजे प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून नेहमीच खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते आणि विविध क्रीडा स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न करतानाच वेळोवेळी शासनालाही त्यांची मदत होत असते प्रवरेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांबरोबरच खेळालाही प्राधान्य देत प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असे क्रीडांगणे सुरू आहेत. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा स्पोर्टस अकॅडमी सुरू करण्यात आली आहे या माध्यमातून अनेक खेळांना प्राधान्य मिळणार आहे. हे प्राधान्य मिळत असताना मैदानाबरोबरच इनडोअर स्टेडीअम प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. आज खेळाडूंसाठी अनेक प्रकारच्या सुविधा शासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगतानाच खेळातूनही विद्यार्थ्यांनी पुढे जावे यासाठी शासनाचा क्रीडा विभाग हा कायमच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोडगे यांनी केले यांनी केले या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना सहकाराच्या माध्यमातून झालेल्या ग्रामीण परिवर्तनचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.