30.2 C
New York
Wednesday, August 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

भागवत प्रतिष्ठिनचा मोफत मोतिबिंदू व नेञतपासणी शिबिराचा उपक्रम स्तुत्य -धनश्रीताई विखे पाटील 

श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):- भागवत प्रतिष्ठान,स्वस्तिक ग्रुप,बुधराणी हाॕस्पीटल व डाॕ.काळे हाॕस्पीटलच्या विद्यमाने मोफत मोतीबिंदू व नेञतपासणी तपासणी शिबिराच्या उपक्रमाने शतक पार करणे हे कौतुकास्पद आहे.अशा उपक्रमातून समाजकार्याची प्रेरणा लाभते तसेच गरजुंची सेवा घडते असे प्रतिपादन सौ.धनश्री सुजय विखे पा.यांनी केले.

भागवत प्रतिष्ठान,स्वस्तिक ग्रुप,बुधराणी हाॕस्पिटल व डाॕ.काळे हाॕस्पिटल्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०१ व्या मोतिबिंदु व नेञ तपासणी शिबीर सौ.धनश्री विखे पा.यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर बेलापूर बु च्या सरपंच मिनाताई साळवी,बेलापूर खुर्दच्या सरपंच सविताताई राजुळे,स्नेहल नवले,मानवी खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य प्रियंका कु-हे,तबसुम बागवान,सुशिलाबाई पवार,जालिंदर कु-हे,बेलापूर मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्ष डॉ. संपदा काळे,सौ. कल्याणी काळे, जालिंदर कुऱ्हे,प्रफुल्ल डावरे,रणजित श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ आदि मान्यवर उपस्थित होते.

सौ.विखे पा.म्हणाल्या की,राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असल्याचे संस्कार विखे कुटूंबावर आहे.याच मार्गाने भागवत प्रतिष्ठान सामाजिक कार्य करीत आहे हे कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.आपली मुले शिकतात व पुण्या मुबईला व परदेशी जाता तसे न होता गावाची सामाजिक सेवा केली पाहिजे. अध्यक्षपदावरुन बोलताना श्री.शरद नवले म्हणाले की,गावकरी मंडळाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली व डाॕ.सुजय विखे.पा.तसेच सौ.शालिनीताई विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव विकासकामे झाली आहेत.जलजीवनच्या पाणी पुरवठा कामांतर्गत नळजोडणीचे काम पूर्ण झाल्यावर गावातील रस्यांची कामे टप्याटप्याने मर्गी लावली जातील.

विधायक कामात पडथळे आणण्याचे काहि जणांकडून षडयंञ केला जाते.त्याला न जुमानता विकासकामे केली जात असल्याचे श्री.नवले म्हणाले. प्रास्ताविक भाषणात भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी मोतिबिंदू व नेञतपासणी शिबीराची माहिती दिली.सन २०१६ पासून अखंडीतपणे शिबिराचा उपक्रम राबविला जात आहे.या अंतर्गत आजवर ४ हजार रुग्णांची तपासणी होवून २८०० शस्ञक्रिया यशस्वीपणे करण्यात आला.या उपक्रमास सहकार्य करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी बेलापुर-ऐनतपूरसाठी १३६ कोटीची पाणी पूरवठा योजना,साठवण तलावासाठी साडे आठ एकर तर ११००घरकुलांसह अन्य नागरी सुविधांसाठी ३४ एकर जागा मोफत दिली. डा.सुजय विखे पा.यांचेही विकासकामांठी सहकार्य लाभते असे श्री.खंडागळे म्हणाले. यानिमित्त बुधराणी हाॕस्पिटलच्या मीरा पटारे, मनिषा कोरडे,डाॕ.सुधीर काळे,डॉ.संपदा काळे आदिंचा सौ.धनश्री विखे पा.यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय सूचना सचिन अमोलिक यांनी मांडली त्यास गोपी दाणी यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सूञसंचालन देविदास देसाई यांनी केले तर सुधाकर तात्या खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी स्वस्तिक ग्रुप, सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य, गावकरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पत्रकार, पेशंट, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!