अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-आ. संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून आणि नवनाथ कातोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेली, अहिल्यानगर प्रीमिअर लीग हि भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा MIDC, येथील जिमखाना मैदानावर दि 1 ऑगष्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मोठ्या उत्सहात पार पडली. सदर स्पर्धेचे आयोजन व नियोजन कुंडलिक आप्पा कातोरे, अनिल आव्हाड व निलेश जरे यांनी अतिशय सुदंर आणि भव्य स्वरूपात केलेले पाहायला मिळाले.
या स्पर्धेसाठी एकूण 14 संघ मालक म्हणून साई कृष्णा वॉरियर्स चे बाळासाहेब बडे व संतोष उगले, समर्थ सर्विसेस 11 चे नानासाहेब जाधव, गुरुदत्त वॉरियर्स चे आबासाहेब जगताप, नवनाथ शेठ कातोरे 11 चे संकेत शेठ भोर, व्हीजन स्पोर्ट्स अकॅडमी चे गणेश दादा खेडकर, पाटील 11 चे पै. राहुल दादा पाटील, अरमान प्रतीक सी सी चे गोरख ढेरे मेजर आणि अल्ताफ भाई चुडीवाले, नगर चॅम्पियन चे सुनील आगरकर आणि विलास लोणारे मेजर, के जी सरकारचे आसिफ (बब्बूभाई) शेख, युनायटेड सिटी हॉस्पिटलचे डॉ. इमरान शेख, रुद्र महाकाल ग्रुपचे सुमित धेंड आणि लव्हारे महाराज, स्वराज 11 चे नितीन खर्डे, आशु मार्केटिंगचे सलीम तांबोळी, स्टार अकॅडमीचे आरशाद पठाण यांच्यात लीग पद्धतीने लढती पार पडल्या. सदर स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून 225 खेळाडूंनी अर्ज दाखल केले होते आणि त्यांच्या मधे लिलाव प्रक्रिया पार पडली. या लीलाव प्रक्रियेचे विस्तृत असे समालोचन रामभाऊ घाडगे यांनी केले.
या 14 संघामधून उपात्य फेरी मध्ये रुद्र महाकाल ग्रुप, के जी सरकार, नवनाथ शेठ कातोरे 11 आणि नगर चॅम्पियन हे 4 संघ दाखल झाले तर अंतिम सामना नवनाथ शेठ कातोरे 11 विरुद्ध के जी सरकार या दोन संघा मध्ये पार पडला. यामध्ये के जी सरकार या संघाने अंतिम सामना जिंकून बाजी मारली तर नवनाथ शेठ कातोरे 11 हा संघ उपविजेता ठरला या दोन संघाना अनुक्रमे प्रथम क्रमांक साठी 71000 रुपये रोख आणि इलेक्ट्रिक स्कूटर व द्वितीय क्रमांक साठी 51000 रुपये रोख आणि इलेक्ट्रिक स्कूटर याप्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक साठी 41000 रुपये रोख व इलेक्ट्रिक स्कूटर आणि चतुर्थ क्रमांक साठी 31000 रुपये रोख व इलेक्ट्रिक स्कूटर या प्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले.
मालिकावीर पुरस्कार कृष्णा कर्डीले यांना तर उत्कृष्ट फलंदाज सुनिल अगरकर यांना उत्कृष्ट गोलंदाज अमोल चव्हान यांना तर उत्कृष्ट क्षेत्र रक्षक पुरस्कार गीतेश शादुल हे मानकरी ठरले. या संपूर्ण स्पर्धेचे क्रिकेट समालोचन शाहरुख शेख यांनी केले तर थेट प्रक्षेपण राहुल वाहेकर यांच्या RV Boss या youtube वाहिनी वरून करण्यात आले. तसेच स्पर्धे साठी पंच म्हणून महेंद्र मोरे, सूरज पगारे, विशाल तिजोरे, शरद मालखेडे यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण वेळी संदेश गाजरे यांनी समालोचन केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी केशव शेठ नागरगोजे, ह भ प राधाकिसन महाराज कातोरे, कुमारभाऊ वाकळे, डॉ सागर बोरुडे, नितीन बारस्कर, उद्योजक बबनराव कातोरे,चेअरमन बाळासाहेब वाकळे, मच्छिन्द्र कातोरे, जालिंदर कातोरे, राहुल कातोरे, पप्पूशेठ कातोरे, अंबिका क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.