श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-भाजपचे जेष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर भाजप कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या नव्या कार्यकारिणीत सामाजिक कार्यकर्ते विशाल अंभोरे यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर भाजप कार्यकारिणी निवडीला अखेर श्रावण महिन्यात मुहूर्त लाभला आहे. या कार्यकारणी मध्ये सरचिटणीस-२, उपाध्यक्ष ११, चिटणीस ६, कोषाध्यक्ष-१, कार्यकारणी सदस्य ५४, कायम निमंत्रित सदस्य – १५ तसेच विविध मोर्चा, आघाडी सेल, आघाडी व प्रकोष्ठ यांचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे.
या नव्या कार्यकारिणीत नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस मा. विजयभाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिनकरअण्णा पटारे यांनी अभिनंदन केले आहे.