कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय कोल्हार बु. विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते 360 फूट लांबीचा व दहा फूट रुंदीचा तिरंगा ध्वज इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व बाजूने धरून ही तिरंगा रॅली विद्यालयापासून ते भगवती माता मंदिरापर्यंत काढण्यात आली.
दरम्यान सर्वप्रथम सकाळी 7.30 वा. विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर 360 फूट लांबीच्या विशाल अशा ध्वजाचे पूजन करून या तिरंगा ध्वजाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
ही विशालकाय तिरंगा ध्वजाची रॅली सर्वांचे आकर्षण ठरत होती. शेवटी भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात या तिरंगा रॅलीची सांगता झाली .
यावेळी कोल्हारचे मा.सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभ संदेश दिला.स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शहिदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या त्यागातूनच आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे ते आपण सर्व धर्म समभावाने एकत्र राहून हे स्वातंत्र्य जपले पाहिजे व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान या कार्यक्रमास भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे, निवेदिता बोरुडे, गोरक्ष खर्डे, रावसाहेब खर्डे, देवालय ट्रस्ट उपाध्यक्ष साहेबराव दळे, पंढरीनाथ खर्डे , संतोष थेटे पा. योगेश कोळपकर, श्रीकांत बेंद्रे, अरुण बोरुडे, दिलीप बोरुडे विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुशराज जामदार उपमुख्याध्यापक सिताराम बोरुडे पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे,सुनील बोरुडे आदी उपस्थित होते. तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शुभम पवार, मच्छिंद्र मोहुंडुळे व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शब्बीर शेख व दीपक मगर यांनी केले.