23.8 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून प्रत्येकाने स्वदेशीचा मंत्र कृतीत आणावा- जि.प. माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणारा देश आता महाशक्ती म्हणून जगात ओळखला जातो आहे.विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून प्रत्येकाने स्वदेशीचा मंत्र कृतीत आणण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा उद्योग समूहाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाचा समारोह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, पाटील,विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे,ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदुशेठ राठी,संजय आहेर,दादासाहेब घोगरे, भाऊसाहेब ज-हाड, गणपतराव शिंदे, दिलीपराव इंगळे, रोहिणीताई निघुते, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे,,प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,डॉ.व्हि.आर.राठी,डाॅ.आर.ए.पवार,डाॅ.महेश खर्डे यांच्यासह सर्व विविध संस्थाचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सौ.विखे पाटील म्हणाल्या, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सर्वागिण विकासाच्या धोरणामुळे देश प्रगती पथावर आहे. आज देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून सामान्य माणसाचा विकास साध्य करण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.

प्रवरा उद्योग समूहातील संस्थाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू आहेत.पद्मश्रीं डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण भुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकारातून समृध्दी साध्य करताना प्रगतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपला. आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण देशासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन सौ.विखे पाटील यांनी केले.

प्रारंभी सौ. शालिनीलाई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी ध्वजारोहण केले. यावेळी एन. सी.सी प्रवरेतील सुरक्षा पथक यांनी शानदार संचालन करत मानवंदना दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृती, परंपरा, लोककला,देशभक्तीपर गीत त्याच बरोबर सामाजिक ऐक्य यांवर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केलेल्या शिक्षक, विद्यार्थी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ शांताराम चौधरी आणि प्रा. रविद्र काकडे यांनी केले.

प्रवरा उद्योग प्रवरा उद्योग समूहातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी यांच्या उपस्थित ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय लोणी आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय लोणी या ठिकाणीही ध्वजारोहण करत विद्यार्थ्यांना देशाप्रती निष्ठा बाळगा शिक्षणातून मोठे व्हा आणि देशाची सेवा करा हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. प्रवरा सहकारी बँक,लोणी, पायरेन्स लोणी, यासह प्रवरा परिसरातील विविध शाळा महाविद्यालय या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयांनी देशभक्तीपर गिते, मिशन सिंदूर त्याचबरोबर भाततीय कला संस्कृतीचे सादर केले. यामध्ये पद्मश्री विखे पाटील मुक कर्णबधिर विद्यालय बाभळेश्वर आणि संस्थेच्या अश्वपथकाने सादर केलेले कौशल्य हे सर्वांचे हे सर्वांसाठीच लक्षवेधी असेच ठरले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!