श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – सालाबादप्रमाणे श्रीरामपूर येथील शहराची मानाची दहीहंडी समजल्या जाणारी राममंदीर चौकात दहीहंडी (गोपालकाला) साजरा केला जातो या वर्षी समितिच्या बैठकीत सर्वानूमते ह्या वर्षीच्या अध्यक्षपदी राहूल पांढरे यांची निवड करण्यात आली.
विशाल अंभोरे यानी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास सिद्धार्थ सोनवणे यांनी अनूमोदन दिले यावेळी मनोज (भैय्या) भिसे ,अजय छल्लारे, अभिजित लिप्टे,गणेश भिसे,महेश ऊदावंत,अक्षय गाडेकर,अभिषेक माळवे, कमलेश भालदंड,अक्षय वर्पे आदी सदस्य उपस्थित होते.
गेल्या १४ वर्षापासून मानाचि दहिहंडी उत्सवात साजरी करण्यात येती ह्या वर्षी रविवार दि. 17ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिर चौक येथे सायंकाळी ६ वाजता सर्व शहरवासीयांनी ऊपस्थित रहावे असे आव्हान श्रीरामपूर दहिहंडी ऊत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे,,