पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी रांधे गावाचे ग्रामदैवत रांधुबाई मातेचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्याची परंपरा गेली अनेक दशके चालत आलेली असून गावातील आडनावावरून श्रावण महिन्यात येणाऱ्या मंगळवारच्या उत्सवाची जबाबदारीची विभागणी करण्यात आली आहे .
परंपरेनुसार सकाळी देवीला अभिषेक , मांडवडहाळे , दुपारी संगीत भजन , सायंकाळी देवीस साडी चोळी , रात्री छबिना मिरवणूक आणि शेवटी करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे
या परंपरेनुसार यंदाही चौथ्या श्रावणी मंगळवार निमित्ताने गावातील विविध आडनावाचा समूह बाराभाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले असून यावेळी त्यांनी करमणुकीच्या कार्यक्रमाला बगल देत जनमनाचा विचार करत गावच्या सोंदर्यात भर घालणाऱ्या उपक्रमाचे नियोजन केले असून गावच्या प्रवेश द्वाराजवळ ” आम्ही रांधेकर ” नाव असलेले एक डिजिटल नावाचे नियोजन केले असून गावच्या प्रत्येका कडून व परिसरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे .
मंगळवारी सकाळी १० वाजता लोकार्पण –
गावच्या सोंदर्यात भर घालणारे ” आम्ही रांधेकर ” हे डिजिटल नाव गावच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आल्यामुळे येणाऱ्या मान्यवरांचे प्रवेशद्वारावरच स्वागत करणारे बोलके चित्र निर्माण होणार असल्या ने गावातील प्रत्येकाच्या जनमनाची भावना निर्माण झाली आहे , यामुळे गावाच्या वैभवात ही नक्कीच भर पडणार आहे , हे ही तितकेच खरे आहे . ]