23.8 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत महायुतीच्या विजयाचा निर्धार करा – ना.राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्‍यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भरतेने यशस्वी प्रवास करीत आहे.विश्वामध्ये सर्वाधिक सदस्य असलेल्या कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन पक्षाकडे आहे. आगामी काळात हिंदुत्वाच्या विचाराने कार्यकर्त्‍यांची ताकदच देशाला बलशाली बनवेल असा विश्वास व्यक्त करतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शत प्रतिशत महायुतीच्या विजयाचा निर्धार करा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी आ.संग्राम जगताप, जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहीते, उत्‍तरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमिताने भाजपा महीला मोर्च्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकलीत करण्यात आलेल्या राख्या पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदीजीना मिळाला. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला सत्‍ता मिळाली. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने नकारात्‍मक प्रचार करुन, मतदारांची दिशाभूल केली मात्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्‍या संघटीत प्रयत्‍नांमुळे मोठे यश आपल्‍याला मिळू शकले.

जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे.विचारांच्या आधारावर आणि कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, अंत्योदयाच्या मंत्रापासून पक्षाचा सुरू झालेला प्रवास आज देशाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेवून जात आहे. कश्मिर मधील ३७० वे कलम रद्द करून या प्रदेशाला विकासाच्या प्रक्रीयेत आणण्याचा ऐतिहासिक निर्णय असो की, नुकत्याच घडलेल्या पहेलगाम घटनेनंतर भारताने पाकीस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्याची घेतलेली भूमिका भारताच्या सामर्थ्याची ताकद दाखवून देणारी ठरली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

सध्‍या देशामध्‍ये केवळ मतदारा याद्यांचे कारण पुढे करुन, कॉंग्रेस नेते राहुल गांधी दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. ऑपरेशन सिंदुरवर शंका उपस्थित करुन, ज्‍यांनी सैनिकांच्या कर्तबगारीवरच संशय निर्माण केला तेच राहुल गांधी आता मतदारांना खोटे ठरविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. मात्र मतदार याद्यांची संपूर्ण प्रक्रीया आयोगाकडून पार पाडली जाते. प्रारुप याद्या जाहीर झाल्‍यानंतर तुम्‍ही हरकती का नाही नोंदविल्‍या असा सवाल करुन, विरोधी पक्षाच्‍या आरोपांना जनतेच्‍या मनात कुठेही जागा नाही मात्र महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी आता या आरोपांना वेळीच उत्‍तर दिली पाहीजे.

आ.संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून मंत्री विखे पाटील म्हणाले की हिंदूत्वाचा विचारच भारताला बलशाली बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील अवैध धंदे आणि अतिक्रमणाबाबत पोलीस प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आहेत. आगामी काळात अतिक्रमणाची मोहीम पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या असल्याने त्याची तयारी सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आ.संग्राम जगताप यांनी बाळासाहेब सानप यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेवून त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे राज चेंबर्सचे नाव टिकून राहीले असल्याचे सांगितले. मंत्री विखे पाटील यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम शहरात राबवली गेल्यामुळेच या भागातील वातावरण चांगले झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आ.संग्राम जगताप यांनीही विरोधी आघाडी करुन, व्‍होट चोरीच्‍या संदर्भात केल्‍या जाणा-या आरोपांचा समाचार घेतला. याप्रसंगी बाळासाहेब सानप, अनिल मोहीते, गीताताई गिल्डा यांनी मनोगत व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!