लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-पक्षाने आपल्याला पदाच्या रुपाने दिलेली जबाबदारी खूप महत्वपूर्ण आहे.संघटनेच्या माध्यमातून पक्षाचा विचार आणि सरकारची धोरण जनतेपर्यत पोहचवा असे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व मंडल अध्यक्षांना देण्यात आलेल्या स्मृती चिन्हाचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर महीला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.शोभा घोरपडे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रउफ शेख यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष आणि मंडलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.रक्षाबंधनाच्या निमिताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरीता लाडक्या बहिणीनी संकलित केलेल्या सुमारे ३१ हजार राख्या मंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे.विचार आणि विकास यांची समृध्द परंपरा पुढे घेवून जाण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी आपल्या सर्वावर असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू आहेत.योजनांची अंमलबजावणी आपल्या मंडलातील प्रत्येक बुथवर होत असल्याची खात्री करा.सरकार आणि संघटन यांच्यात योग्य समन्वय करून अनेक चांगली काम प्रभागात गटात आणि गणांमध्ये करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आपल्या भाषणात सूचित केले.
देशात आणि राज्यात विरोधी पक्षाकडून होत असलेल्या अपप्रचाराला तेवढ्याच ताकदीने उतर देण्याची भूमिका आपल्या घ्यावी लागेल.देशातील आणि राज्यातील जनतेन विश्वास दाखवला म्हणूनच महायुतीची सता राज्यात पुन्हा येवू शकली आणि मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाल्याचे विखे पाटील म्हणाले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.त्याची तयारी आताच सुरू करा.संघटन मजबूत करताना आपले बुथ अधिक सक्षम करण्यासाठी काम सुरू करण्याचे आवाहन केले.
रक्षाबंधनाच्या निमिताने उतर अहील्यानगर जिल्ह्यातील तालुक्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महीला पदाधिकार्पदाधिकार्यांनी संकलित केलेल्या ३१ हजार राख्या मंत्री विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.संपूर्ण जिल्हयातून संकलित झालेल्या राख्या मुख्यमंत्र्याकडे सोपविण्यात येणार आहेत.