राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- सपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी हृदय पिळवून टाकणारी घटना शिर्डी परिसरात कोऱ्हाळे गावचे भागात एका विहीरीत आज दुपारी ४ चे सुमारास वडील व त्यांची तीन मुले व एक मुलगी असे पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
या कुटुंबातील त्यात वडील अरुण काळे मुलगी शिवानी , मुले प्रेम, विर , कबीर काळे अशी नावे आहेत चार मुलांसह बापाचा विहिरीत मृत्यु कसा झाला ? घातपात ? का आत्महत्मा ? याची उलट सुलट चर्चा सुरू असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी शिरीष वमने घटनास्थळी दाखल झाले असून विहीरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे एकीकडे राज्यात दहीहंडीचा जल्लोष सुरू असतांना ही भयानक हृदय पिळून टाकणारी घटनासमोर आली आहे .
सूत्राच्या माहितीनुसार कोऱ्हाळे (ता. राहता)माहेरी गेलेल्या पत्नीचा सासरी परत येण्यास नकार होता असे समजले आहेत. पतीचा फोन नंबरही ब्लॉक केला. तिला घ्यायला निघालेल्या पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवरातील घटना. चिखली ता. श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे (वय ३०) याने आपली एक मुलगी व तील मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली. काळे याची पत्नी येवला तालुक्यातील माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी तो मुलांना घेऊन दुचाकीवरून निघाला होता. राहाताजवळ गेल्यावर त्याने पत्नीला फोन केला. मात्र तिने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने काळे याने दारूच्या नशेत हे कृत्य केले. आज दुपारी ही घटना उघडकीस आली.