लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-महिलांची समाजात आर्थिक प्रगती कशी करता येईल व या माध्यमातून त्यांना स्थैर्य प्राप्त होऊन या महिलांना स्वावलंबी बनविण्याचे महान कार्य स्व. सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांनी केले असे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा.डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत आयोजित श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रा.डॉ.कदम बोलत होते.
यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप महाले, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे , कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष क्षीरसागर , अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ चंद्रकला सोनवणे,सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. भाऊसाहेब घोरपडे आणि प्रा. स्वरांजली गाढे यांनी श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रमेश जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकर, प्रा.संदीप पठारे, प्रा. शुभम मुसमाडे , कार्यलयीन अधीक्षक श्री किशोर गुळवे आदींनी प्रयत्न केले