20 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोहेगाव व जवळकेची जबाबदारी कोपरगाव पोलीस स्टेशनकडे-आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी(जनता आवाज वृत्तसेवा) :- कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे गटातील पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे शिर्डी पोलीस स्टेशनला जोडलेली असल्यामुळे या गावातील नागरीकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता.

त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने सदरच्या प्रस्तावाची दखल घेवून पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आणली आहे. त्यामुळे आता या गावातील नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोपरगाव पोलीस स्टेशनकडे देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे गटातील पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे कोपरगाव तालुक्यात आहेत मात्र या गावातील नागरीकांना पोलीस स्टेशनच्या बाबतच्या सर्व अडचणी शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सोडवाव्या लागत होत्या. शिर्डी पोलीस स्टेशनवर जगप्रसिद्ध शिर्डी देवस्थान व त्या ठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची तसेच देशभरातून येणाऱ्या अतीमहत्वाच्या राजकीय, अराजकीय व्यक्ती यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असल्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशन नेहमीच व्यस्त असते. त्यामुळे या गावातील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे आमची गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी अशी या गावातील नागरीकांची कित्येक वर्षापासूनची मागणी होती.त्या मागणीची पूर्तता झाली असून पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे शिर्डी पोलीस स्टेशनला जोडण्यात आली आहेत. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहे. मागील अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण केल्याबद्दल पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!