पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – महागणपती मल्टीस्टेट संस्था ही विश्वास व पारदर्शकतेच्या जोरावर चोखपण चालतेच , तर संस्था बाजारात गुंतवलेल्या गुंतवणूकीतून मिळालेल्या नफ्यावर पण चालते , असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी केले .
महागणपती मल्टीस्टेट संस्थेच्या अकोले शाखेचा शुभारंभ अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या शुभहस्ते पार पडला, प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख , भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पवार, हभप रामनाथ महाराज जाधव, अरुण सदाशिव जाधव,महागणपती मल्टीस्टेट संस्थेचे नवनिर्वाचित संचालक योगेश जाधव, संचालिका सौ.शोभा टिकेकर , भाऊसाहेब देशमुख , अगस्ती पतसंस्थेचे संचालक सुरेश देशमुख , ग्रामपंचायत सदस्य बबलू देशमुख , व्ही बी पी ग्रुप चे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर देशमुख, महागणपती मल्टीस्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान सन्नके, एच. आर. स्वाती कुऱ्हाडे, संस्थेचे सॉफ्टवेअर प्रमुख राम बल्लाळ, ऑपरेशन हेड रवींद्र हगवणे, महागणपतीच्या सर्व शाखांचे पदाधिकारी, ठेवीदार अशोक भाटकर , हिराबाई भाटकर व इतर मान्यवर उपस्थित होते .
प्रास्ताविक करताना व्ही बी पी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर देशमुख म्हणाले की , गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने महागणपती संस्थेच्या २१ व्या शाखेचा शुभारंभ करत आहोत , इतर पतसंस्था ठेवीदारांना ८ ते १० टक्के व्याज दर देतात , महागणपती संस्था आकर्षक योजनांव्दारे १३ टक्के व्याज देते . वरिष्ठ व्यक्तींना जास्त व्याजदर दिला जातो . सभासद ठेवीदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करतो , असे सांगून त्यांनी व्ही बी पी ग्रुप व महागणपती संस्था परिवाराच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली .
संस्थेचे चेअरमन विकास बेंगडे पाटील म्हणाले की , ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांची गुंतवणूक सुरक्षित राहून चांगला परतावा मिळावा व यांना सधन व्हावा , हा मानस ठेऊन येथे शाखा सुरू करण्यात आली आहे .
आ . डॉ . किरण लहामटे हे साधे व मातीतला माणूस असून त्यांनी अकोले तालुक्यासाठी राज्य सरकार करून सर्वांत जास्त २ हजार ५०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला, ते सामान्यांना जाणणारे व्यक्तिमत्व आहे. महागणपती संस्थेला महाराष्ट्र व कर्नाटक या २ राज्यांचे कार्यक्षेत्र असून केंद्र सरकार च्या नियमांनुसार संस्थेची स्थापना आहे , मल्टीस्टेट संस्थांवर व्याजदराच्या निश्चिती बाबतीत रिझर्व बँकेचे अजून कोणतेही निर्बंध नसल्याने आपण कमवत असलेल्या नफ्यातून आपल्या ठेवीं वर जास्त व्याज दिले जाते व १५ टक्के लाभांश सुद्धा दिला जातो. संस्थांप्रती केंद्र सरकारचे ३ प्रकार ची वर्गवारी आहे १०० कोटी रुपयांच्या छोट्या संस्था , १०० ते ५०० कोटी रुपयांच्या मध्यम संस्था , तर ५०० रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मोठ्या संस्था असून महागणपती सध्या मध्यम या दुसऱ्या प्रकारात येते , लवकरच ३ ऱ्या प्रकारात संस्था जाणार आहे .
त्यामुळे एकूण ठेवींपैकी २५ टक्के ठेव बाजारातील इतर गुंतवणूक क्षेत्रात गुंतवता येते , म्हणून संस्था जास्त व्याज देऊ शकते . त्याचबरोबर संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ , आंबा महोत्सवात आंबा पेटी वाटप , ज्येष्ठांना अष्टविनायक यात्रा या योजना राबविण्यात येते . यावर संस्थेने बाजारात गुंतवलेल्या गुंतवणूकीच्या नफ्यातून हा खर्च भागवला जातो . लोकांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे . स्वावलंबी बनून स्वाभिमानी जगणे , यावर संस्था काम करते . संस्था विविध मार्गाने करत असलेल्या व्यवसायातून जो ढोबळ नफा कमवते , त्यातून संस्था इतरांना विविध योजनांच्या माध्यमातून वाटते . यातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याने जरी मोठा ठेवीदार अचानक ठेव काढण्यासाठी आला , तरी त्याला त्वरीत ठेव दिली जाते , त्याला थांबवले जात नाही. आगामी काळात आर्थिक महागणपती संस्था अधिक सबळतेने चालेल , हा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल . संस्थेचा कारभार हा पुर्णपणे पारदर्शक व विश्वासार्हत पद्धतीने चालतो , असा ठाम विश्वास ही चेअरमन बेंगडे पाटील यांनी व्यक्त केला.
आ . डॉ . किरण लहामटे म्हणाले की , चेअरमन विकास बेंगडे पाटील हे गुंतवणूक व सहकार क्षेत्रातील एम डी आहेत , तर आम्ही राजकीय क्षेत्रातील एम डी आहोत . एवढ्या छान संस्थेच्या शाखेचा कोतुळ येथे शुभारंभ केला . बिना अर्थ , हे सर्व व्यर्थ आहे . महागणपती संस्था कोतुळ च्या वैभवात भर घालत आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही बी पी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी केले , तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली