लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्दीने जागतिक पातळीवरती आपले नाव करू शकतात यासाठी गरज आहे ती बदलत्या काळानुरूप बदलण्याची आणि हेच बदल आपल्या व्यवसायामध्ये करत ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळेत शिकलेल्या आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये संगणक अभियांत्रिकी ची पदवी घेतलेल्या प्रवरा परिसरातील दुर्गापूर येथील शेतकरी कुटुंबातील आशुतोष छगनराव पुलाटे यांनी जागतिक पातळीवरती आपली वेगळी ओळख निर्माण करत इकोनॉमिक्स टाइम्सचा तेलंगणा २०२५ मधील ईटी एक्सलन्स पुरस्कारांत “एआय, तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील व्हिजनरी सीईओ ऑफ द इयर देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या प्रवरा परिसरातील दुर्गापूर येथील प्रवरा बँकेचे माजी अध्यक्ष माजी संचालक छगनराव भाऊराव पुलाटे यांचे चिरंजीव परिस्थिती चांगली असतानाही गावातील प्राथमिक मराठी शाळा, प्रवरा माध्यामिक विद्यालय दुर्गापूर, विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लोणी आणि प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथून संगणक अभियंता असा त्यांचा शैक्षणिक प्रवास नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करत आपल्या उणिवा शोधत पुणे ते अमेरिका हा नोकरीचा प्रवास करतांनाच ग्रामीण विद्यार्थी हा हुशार, प्रामाणिक आणि जिद्दी आहे त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा उद्देश ठेऊन पी. ९९ सॉप्ट प्रा. ली. ही कंपनी सुरु केली. सध्या कंपनीच्या माध्यमातून विविध देशातील प्रोजेक्ट सुरु आहे. अमेरिका, हैद्राबाद बंगलोर, पुणे,लोणी येथे कंपनीचे ऑफीस आहेत. सहकारचा संदेश दिला तेथे कंपनीचे ऑफीस सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या कंपनीमध्ये १७० हून अधिक संगणक तज्ञ असून साॅप्ट वेअर मधील अनेक देशाचे प्रोजेक्ट सुरु असून यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल आहे.ग्रामीण भागात सुरु झालेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शाखेतून ग्रामीण मुलांना रोजगार मिळण्याबरोबरचं प्रवरेचा माजी विद्यार्थी हा कर्मभुमीसाठी ही प्रयत्न करतो आहे.
या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आशुतोष पुलाटे म्हणाले, महाराष्ट्रातील एका लहान गावातून एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी स्थापन केली आहे. आज वंचित भागात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आणि उच्च-प्रभाव तंत्रज्ञान सेवा देण्यावर विशेष भर आहे. २०२१ मध्ये स्थापन झालेल्या पी 99 साॅप्ट प्रा.ली. ने क्लाउड-नेटिव्ह डेव्हलपमेंट, सीआर एम, इ आर एम अंमलबजावणी, उत्पादन अभियांत्रिकी आणि एंटरप्राइझ डेटा/एआय सोल्यूशन्समध्ये विशेषज्ञ असलेल्या १७०+ व्यावसायिकांसह वार्षिक उत्पन्नात $५ दशलक्ष पेक्षा जास्त वाढ केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट टियर ३ आणि टियर ४ शहरांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करणे, वंचित भागात सक्रियपणे नोकऱ्या निर्माण करणे आणि ग्रामीण क्षमता आणि जागतिक संधींमधील दरी भरून काढत आहे. पी ९९ सॉफ्ट क्लाउड-नेटिव्ह डेव्हलपमेंट, सीआरएम आणि ईआरपी अंमलबजावणी, एंड-टू-एंड उत्पादन अभियांत्रिकी आणि एंटरप्राइझ डेटा/एआय सोल्यूशन्समध्ये तज्ज्ञता देते, ज्यामध्ये रिअल-टाइम अॅनालिटिक्स आणि प्रेडिक्टिव्ह इंटेलिजेंसचा समावेश आहे.शिवाय कंपनी गेम आर्किटेक्चर, क्रॉस-प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी, कार्यप्रदर्शन ऑप्टिमायझेशन, मल्टीप्लेअर वातावरण आणि चाचणीसह गेमिंग स्टुडिओना देखील समर्थन देते.
भागातील माझ्यासारख्या मुलांना प्रवरेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळाले हे प्रोत्साहन मिळत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हा होतकरू कष्टाळू आहे आणि त्याला योग्य ठिकाणी संधी द्यावी म्हणून मी काम करत आहेत असे आशुतोष पुलाटे यांनी आवर्जून सांगत हे प्रयोगशील आई लताताई आणि वडील आई छगनराव आणि मामा विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले.
त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीणा शिक्षण संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील, गोवा महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीतज्ञ आर. बी. पुलाटे पायरेन्सचे माजी अध्यक्ष एम. एम. पुलाटे आदींनी अभिनंदन केले आहे.