अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-– प्रभाग क्रमांक दोन मधील माजी नगरसेवक निखिल वारे यांचे शहर विकासासाठी, प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी असलेली कार्यपद्धती, सर्व पक्षांशी असलेला समन्वय लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून लोकसभा निवडणुकीत केलेले काम, प्रभागातून दिलेला लीड, जनतेशी असलेल्या दांडगा संपर्क यामुळे भारतीय जनता पार्टीने जिल्हा कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करताना महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी निखिल वारे यांना सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी स्वतः लक्ष घातले असून हे नवीन तरुण पदाधिकाऱ्यांची केलेल्या निवडीवरून स्पष्ट होत आहे. याबाबत निखिल वारे यांना या निवडीबद्दल विचारले असता ते म्हणाले मी एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय जीवनात काम करताना विविध संघटनांमधून काम केलेले आहे. आता भाजपाने पक्ष संघटनेचे काम करण्याची संधी दिल्याने आनंद होत आहे. मी पक्षात काम करताना जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवून तसेच नवीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन भाजपाची संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करील.गेल्या 20 वर्षांपासून प्रामाणिक पणे प्रभागातील जनतेची कामे करताना राजकारण केले नाही सर्व पक्षांशी जवळीक ठेवल्याने विकास कामांना चालना मिळाली. जनतेची कामे, प्रभागाचा विकास हे ध्येय ठेवून मी कामे केली आहेत.
भाजपाने माझ्यावर सोपवलेली हि जबाबदारी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, डॉ.सुजय विखे पाटील,शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पार पाडील.पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात करून संघटना मजबूत करून येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपाचे नगरसेवक निवडून आणून भाजपाची सत्ता आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.