अकोले(जनता आवाज वृत्तसेवा):-मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनि अनंत सालगुडे, पो.अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
दि.18 रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी नेमण्यात आलेले पथक अकोले शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास अकोले शहरात बस स्टँडसमोर, नवले कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा हार जितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.
पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी आरोपी नामे नितीन निवृत्ती गायकवाड( वय 30 वर्षे, रा.इंदिरानगर, अकोले),अमोल मारुती मोहिते, (वय 25 वर्षे, रा. इंदिरानगर),, वैभव राजेंद्र गायकवाड, (वय 25 वर्षे, रा. कुंभारवाडा, अकोले) व्हेल्सी गफुर वाघीलो( वय 30 वर्षे, रा. शाहुनगर, अकोले),अक्षय बाबासाहेब सकट(वय 24 वर्षे, रा शिवाजीनगर, अकोले), भाऊराव आवारी(वय 26 वर्षे, रा. धामनगाव, ता. अकोले), अरबाज मोहम्मद शेख(वय 25 वर्षे, रा. शिवाजी चौक, अकोले), आकाश संजय परदेशी( वय 32 वर्षे, रा. कुंभारवाडा, अकोले), रमेश एकनाथ फापाळे(वय 30 वर्षे, रा. लिंगदेव, अकोले),अनिल बाळु पवार(वय 35 वर्षे, रा. शाहुनगर, अकोले), विकास दत्तात्रय आबरे(वय 29 वर्षे, रा. गणोरे, अकोले), खंडु केरु सदणीर( वय 28 वर्षे, रा. खिरवीरे, अकोले) शंशीकांत मुरलीधर बेनके(वय 30 वर्षे, रा. खिरवीरे, अकोले),अशोक राजेंद्र जगताप, (वय 25 वर्षे, रा.शिवाजी महाराज चौक, अकोले), गणेश हौसराव साबळे( रा. शनि मंदीरच्या पाठीमागे, अकोले), (फरार) अतुल जालींदर नवले( रा. अगस्ती आगार, अकोले)(फरार) हे सर्व आरोपी अकोल्या तालुक्यातील आहे. हे 4,98,700/- रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य साधनांसह ऑनलाईन बिंगो, मटका, व डॉलर नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळुन आले आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोकॉ. आकाश राजेंद्र काळे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस स्टेशन गु.र.नं. 394/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



