बेलापूर (जनता आवाज वृत्तसेवा):–घरकुल लाभार्थ्यांना एक गुंठा जागा नावावर करून द्या या मागणीवरून बेलापूरच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला तु तु मैं मैं वरुन सुरु झालेला गदारोळ हमरा तुमरीवर व माइक ओढा ओढीत झाला. ग्रामसभेत गोंधळ होताच पोलिसांनी ज्यादा कुमक मागविली .पाच तास चाललेला ग्रामसभेचा वाद अखेर सुनील मुथा यांच्या मध्यस्थीनंतर मिटला. स्वातंत्र्यदिनी घेतली जाणारी ग्रामसभा आज बेलापूर ग्रामपंचायत च्या प्रांगणात सरपंच सौ मीनाताई साळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी अहवाल वाचन केले त्यानंतर जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा विषय निघाल्यावर या ग्रामसभेस जलजिवन पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे अधिकारी, ठेकेदार का उपस्थित नाहीत असा सवाल माजी सरपंच भरत साळुंके ,चंद्रकांत नाईक बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केला. जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाईप रस्त्याच्या मधोमध टाकून नळ जोडणी देण्यात आल्यामुळे भविष्यात नळ कनेक्शन गळती झाल्यास पुन्हा पक्के रस्ते खोदावे लागणार असल्याचे मत साळुंखे व नवले यांनी व्यक्त केले.
यावेळी अभिषेक खंडागळे यांनी लवकरच ग्रामसभा घेऊन ग्रामस्थ, अधिकारी, पत्रकार, गावातील सुज्ञ नागरिक यांना बरोबर घेऊन आपण पाहणी दौरा करू व काही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगितले.तळ्याचा ठेका कोणाला दिला नळ कनेक्शन जोडणी चा ठेका कोणाला दिला काम कोण करते अशी विचारणा चंद्र पा. नाईक यांनी केली अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की लवकरात लवकर बैठक बोलावली जाईल.
तसेच जे अनाधिकृत नळ जोडणी असेल ती पैसे भरून घेऊन अधिकृत करण्यात येईल. त्यानंतर बालविवाह थांबविण्यात यावे बालविवाह मुक्त गाव करण्यात यावे असा विषय ग्रामविकास अधिकारी लहारे यांनी मांडला. यानंतर वृक्षारोपणाचा विषय निघाला असता देविदास देसाई यांनी सांगितले की सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बेलापूर गावाला जोडणारे जे उप रस्ते आहेत त्या रस्त्याला झाडे लावण्याचे प्रयोजन असून त्याकरिता ग्रामपंचायतीने आम्हाला खड्डे घेऊन द्यावे तसेच वृक्ष लागवडीनंतर टँकरने त्याला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यावी. आमच्याकडे वृक्षारोपणा करता निधी जमा असल्याचे सांगितले. यावेळी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका यांना ग्रामसभेला उपस्थित राहणे बंधनकारक असताना ते उपस्थित का राहत नाही असा सवाल सुधीर नवले यांनी केला. यावेळी मारुती राशिनकर यांनी झेंडा चौक ध्वजस्तंभ इतरत्र हलवावा किंवा त्याची उंची कमी करावी जेणेकरून होणारे अपघात कमी होतील अशी सूचना मांडली.
घनकचऱ्याबाबत नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र द्यावा असे आव्हान खंडागळे यांनी केले त्यावेळी सुधीर नवले यांनी घनकचरा व्यवस्थापना करता किती निधी आला खर्च किती झाला त्यात ग्रामपंचायत ने किती दिला याची माहिती ग्रामसभेला द्यावी अशी मागणी केली कर फेअर आकारणी बाबत अगोदर बेकायदेशीर झालेले बांधकामावर कारवाई करावी मगच टॅक्स वाढवावा. तसेच नागरिकांना सुविधा द्या मग प्लॅन रिवाईज करा अशी मागणी चंद्रकांत नाईक यांनी केली यावेळी घरकुलाबाबत विषय निघाला असता माजी सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले की घरकुल योजनेचे निकष काय आहे किती घरकुल मंजूर झालेत बाकी किती आहेत प्रत्येक घरकुलाला जागा किती देणार याची माहिती ग्रामसभेत द्यावी अशी मागणी केली यावेळेस अभिषेक खंडागळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार अद्यावत सोयीयुक्त घरकुल कॉलोनी तयार करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला अर्धा गुंठा जागा घरकुलाला देणार असल्याचे सांगितले तसेच घरकुल कसे असणार आहे त्याचा प्लॅन कसा आहे याची विस्तृत माहिती अभिषेक खंडागळे यांनी ग्रामसभेत दिली.
त्याचवेळी महेंद्र साळवे यांनी घरकुल मिळालेल्या व्यक्तीकडून पैसे कशाचे मागता तुम्हाला भ्रष्टाचार करावयाचा आहे का कुठलाही घरकुल वाला एक रुपया देणार नाही त्याच्या नावावर जागा करून द्या ज्याच्या ताब्यात जागा मिळेल तो त्या पद्धतीने घरकुल बांधील ग्रामपंचायत नेत्यांनी व सदस्यांनी त्यात हस्तक्षेप करू नये असा मुद्दा मांडला.
या विषयाला मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उत्तर देत असतानाच ग्रामस्थ त्याचबरोबर सुधीर नवले ,महेंद्र साळवी,भरत साळुंखे व शरद नवले यांच्यात बाचाबाची झाली. तुम्ही भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप महिंद्र साळवी, नवले, साळुंखे यांनी केला प्रत्येक घरकुल लाभार्थ्याकडून एक लाख 7 हजार रुपयाची मागणीकोणी केली 1000 घरकुलाचे पैसे होतात किती आणि ते पैसे कोणाला द्यायचे कुणाच्या खिशात जाणार असा सवाल साळवी यांनी केला. शरद नवले हे याबाबत उत्तर देत असतानाच महेंद्र साळवी, सुधीर नवले भरत साळुंखे त्याचबरोबर ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी आम्ही कसलेही पैसे देणार नाही. आमच्या नावावर एक गुंठा जमीन सातबारा उतारा सह द्यावी अशी जोरदार मागणी गायकडवस्ती येथून आलेल्या महिलांनी केली या मागणीमुळे ग्रामसभेत गोंधळास सुरुवात झाली त्यावेळी प्रचंड गदारोळ सुरु झाला.
त्याच वेळी दत्ता कुर्हे व चंदू पाटील नाईक यांनी सांगितले की बेलापूरला जागा मिळावी याकरता आम्ही देखील प्रयत्न केलेले होते केवळ आपण एकट्यानेच याचे श्रेय घेऊ नये असे मत मांडले यावरून व एक लाख 7 हजार रुपये या विषयावरून वादावादीला सुरुवात झाली चर्चा करताना माईक ओढाओढी झाली त्यामुळे मालकही बंद पडला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही झाला वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली व जास्त गोंधळ वावल्यामुळे पोलिसांनी जादा कुमक मागविली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या फौजफाट्यासह तातडीने ग्रामसभेच्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही बाजूचे म्हणणे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ऐकून घेतले परंतु ग्रामसभा न संपताच नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर न देताच सभा गुंडाळली असल्याचा आरोप सुधीर नवले ,भरत साळुंके ,महिंद्र साळवी विक्रम नाईक यांनी केला तर अभिषेक खंडागळे व शरद नवले यांनी नियमानुसार ग्रामसभेचे कामकाज संपुष्टात आले असल्याचे सांगितले
त्यावेळी दोन्ही बाजूने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या कामकाज पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घ्यावा अशी मागणी करत सुधीर नवले महेंद्र साळवी परत साळुंखे विक्रम नाईक यांनी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले त्यावेळी निषेदाच्या घोषणा देण्यात आल्या बाहेर एक गट निश्चितच घोषणा देत असतानाच ग्रामपंचायत मध्ये शरद नवले अभिषेक खंडागळे यांच्याबरोबर असलेले कार्यकर्त्यांनी देखील दादागिरी खपून घेणार नाही अशा घोषणा देण्यास सुरुवात केली यामुळे वातावरण आणखीनच चिघळले.
अखेर तीन वाजता सुनील मुथा आल्यानंतर त्यांनी शरद नवले अभिषेक खंडागळे ग्राम विकास अधिकारी लहारे यांच्याशी चर्चा करून व यावर तोडगा काढला त्यानंतरही विक्रम नाईक यांनी ग्रामसभेचे माझे प्रश्न अनुत्तरीत आहेत त्याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली त्यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिले जाईल असे आश्वासन दिले व शेवटी या वादावर पडदा पडला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद नवले यांनी सांगितले की आम्ही कुणालाही एक लाख रुपये मागणी केलेली नाही. ही केवळ विरोधकांनी पसरलेली अफवा असून भविष्यात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला व चांगल्या कामाला खिळ घालण्याचा हा विरोधकाचा प्रयत्न आहे परंतु तो सफल होणार नाही नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेनुसार आपण घरकुले बांधणार आहोत परंतु यामध्ये कोणालाही सक्ती केली जाणार नाही ज्यांची इच्छा असेल अशांनाच यामध्ये समाविष्ट केले जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले.
याबाबत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले की घरकुलाबाबत जसे ठेकेदाराकडून निविदा मागवल्या तशाच निविदा सर्व कामांमध्ये का मागविल्या नाही गावात चाललेला भ्रष्टाचार, निकृष्ट कामे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.