ममदापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील ममदापुर येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळीतील सहा जणांना 01 वर्षा करीता हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे .
पोलीस अधीक्षक म्हणुन सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सलग तिसरी कारवाई करण्यात आली आहे . बातमीतील हकीगत अशी की, टोळीप्रमुख नियाजअहेमद फकीरमहंमद शेख (कुरेशी)(वय 40 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापुर) टोळी सदस्य नावे सद्दाम फकीरमहंमद शेख (कुरेशी)( वय 30 वर्षे), जकरीया शब्बीर कुरेशी, (वय 32 वर्षे), वसीम हनिफ कुरेशी, (वय 28 वर्षे), कैफ रऊफ कुरेशी (वय 24 वर्षे), अरबाज अल्ताफ कुरेशी, (वय 24 वर्षे), राहणार सर्व राहत्या तालुक्यातील असून त्यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता अवैध अग्नीशस्त्र विक्री करण्या करीता बाळगणे, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे,गैर कायदयाची मंडळी जमवुन घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे व मा.जिल्हादंडाधिकारी यांचे जमाव बंदी आदेशाचे उल्लंघण करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणे, गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसची वाहतुक करणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती.
टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन 2014 ते 2024 मध्ये सराईतपणे केले असुन टोळीच्या गैर कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई व प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हाता तसेच लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीत व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द . कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकण यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, अहिल्यानगर यांनी चौकशी करुन शिफारस अहवाल सादर केला होता.
अहिल्यानगर जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील शरीराविरुध्द व मालाविरुध्द, गोवंशीय कायदयान्वये तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांची टोळीची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच आणखी गुन्हेगारांचे टोळीची माहिती संकलीक करण्याचे काम चालु त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार असल्याचे संकेत मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, तथा हद्दपार प्राधिकरण अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.