16.6 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

पत्नीचा खून करत पतीने केली आत्महत्या,  या घटनेने चासनळीत खळबळ

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली. दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे (अंगणवाडी सेविका) यांना मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सकाळ पासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला.

याबाबत सदर घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान,दिलीप हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या.असून घरातील भिंतीवर दिलीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही लिहून ठेवलेले आढळले असून,नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच मृत स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या मृत्यूने चासनळी गावासह परिसरातील महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात भयान शांतता पसरली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!