19 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

आपण पुढे गेलो आता इतरांनाही पुढे नेऊ या.. प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापुर येथील माजी विद्यार्थ्यांचा प्रयत्न

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):ते एकत्र आले त्यांनी संकल्प केला की आपण आपल्याबरोबरच इतरांच्या भविष्यासाठीही काहीतरी करू या सहकारातून समृद्धीकडे या माध्यमातून आपण पुढे गेलो इतरांनाही आपण आपल्या सहकार्यातून पुढे नेऊया हा संकल्प केलाय लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापूर येथील १९९८ च्या इयत्ता दहावीच्या मित्र परिवारांने… 

२७ वर्षा नंतर एकत्र मुलांनी गावासाठी त्याचबरोबर गावातील आपल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त केला. प्रवरा परिसर म्हणजे सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश देणारी भूमी याच माध्यमातून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विचार पुढे नेत आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापुर येथील १९९८ मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांनी एकत्र येत स्नेह मेळावा  कृषिभूषण ऍग्रो टुरिझम , चंद्रापुर येथे संपन्न झाला.

या मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यासाठी येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आपल्याबरोबरच इतरही मुले पुढे जावेत त्यांच्यावरती योग्य प्रकारे संस्कार व्हावेत त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्नेह मेळाव्यामध्ये एक आराखडा तयार केला आणि या आराखड्यानुसार त्यांनी आपले कामही सुरू केले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रवरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचावा आणि यासाठी डॉ. विखे पाटील या नेहमीच प्रयत्नशील असतात. ग्रामीण विद्यार्थी हा नोकरी बरोबरच स्वयंरोजगार निर्माण करणारा व्हावा त्यांनी समाजासाठी कार्य करावे हाच उद्देश या मेळाव्याच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला .

यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेली चाळीस माजी विद्यार्थी सहभागी झाले. आय टी, औषध निर्माण, मेकॅनिकल, कृषि, विधी, स्थापत्य, शिक्षण, विमा,राजकीय, विपणन, प्रगतशील शेतकरी इत्यादीचा सहभाग होता. आशुतोष पुलाटे स्वतः आय टी क्षेत्रात हैदराबाद एक उत्तम कंपनी चालवतात, डॉ रवींद्र जाधव हे प्रवरा औषधनिर्माण महाविद्यालयात प्राचार्य आणि श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिक क्षेत्रात काम करतात, अमजद शेख – चंद्रपूर येथे नामांकित मेकॅनिकल कंपनीत नोकरी आणि एकास्वयंसेवी च्या माध्यमातून सामाजिक कार्यत सहभाग,डॉ रमेश जाधव – प्रवरा कृषि महाविद्यालय प्राध्यापक, जिल्ह्यात कृषि विस्ताराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहेत.अॅड नकुल तांबे हे प्रवरा मेडीकल ट्रस्ट,लोणी मध्ये विधी तज्ञ व दाढ गावामध्ये उपसरपंच म्हणून राजकीय कार्य करत आहेत, अविनाश पुलाटे बंगळूर स्थित औषधनिर्माण कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी, इब्राहिम पठाण – हैदराबाद स्थित औषधनिर्माण कंपनीत उच्च पदस्थ ,सविता तलोळे, शेख रेश्मा शिक्षण क्षेत्रात कार्य,संदीप तांबे, संदीप पुलाटे , अभय तांबे-प्रगतशील शेतकरी, दत्तात्रय मनकर- पशूवैद्यकीय क्षेत्र, जुबेर पटेल – कुकुटपालन, मनोज पुलाटे – विमा क्षेत्रात कार्य, सर्फराज पटेल कोल्हापूर येथे स्थापत्य क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी, वैशाली पुलाटे, ज्योती खांदे रणरागिणी महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत आहेत, सचिन तांबे स्टेशनरी व्यवसाय,विनोद गवळी- विपणन तर पुनम कु -हे संगणक क्षेत्रातील व्यवसाय करतात.

धमाल मस्ती, विविध गाणे आणि विविध खेळाच्या माध्यमातून दिवसभर या मित्रांनी धमाल केली आणि ही धमाल करतांना आपण सर्वजण ग्रामीण भागातून पुढे गेलो आहोत. विद्यार्थ्यांसाठी आपणही मार्गदर्शन करावे हा संकल्प करत असतानाच ग्रामीण विद्यार्थी हा जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल आणि प्रवरेचे नांव जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!