श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा येथे पार पडलेल्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या ३८ व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत श्रीरामपूर, बेलापूर, खंडाळा शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
फक्त ५ मिनिटांत गणितीय क्रिया करण्याच्या या स्पर्धेत ईश्वरी जाधव, खुशी म्हस्के, स्नेहल अभंग, अविष्कार अनाप, श्रेया सदाफळ, ओवी म्हस्के आणि आराध्या भगत या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनचा किताब पटकावला. तसेच ५२ विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले असून उर्वरित विद्यार्थ्यांनी ‘एक्सलंट’ आणि ‘बेस्ट प्राईज’ मिळवले.
दरम्यान श्रीरामपूर, बेलापूर, खंडाळा शाखेतील प्रणव खोसे, साई राजुळे, दर्शन गुजराथी, सार्थक कुऱ्हे, श्रेयश आवारे, आराध्या पठारे, कार्तिकी चंदन, श्रेया वालझाडे, अनन्या शिंदे आणि नेतल म्हस्के या दहा विद्यार्थ्यांनी सर्व स्तर पूर्ण करून ‘अबॅकस मास्टर’ पदवी मिळवली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीरामपूर शाखेच्या संचालिका सोनाली भाग्येश ठाणगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.