26.9 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेवगांव येथील प्रेमसंबंधातुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी प्रवरा संगम येथुन जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

शेवगांव (जनता आवाज वृत्तसेवा):- येथील प्रेमसंबंधातुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी प्रवरा संगम,  येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई केली आहे.

अशी की, दि. 12 रोजी मुंगी, ता. शेवगांव गांवचे शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळुन आलेले होते. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे तक्रारदार श्री राहुल पुंडलिंक औताडे रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छ. संभाजीनगर यांचे तक्रारीवरुन दाखल आहे.

सदर खुनाचे गुन्ह्यातील आरोपी नामे  श्री दुर्गेश मदन तिवारी रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर,  श्रीमती भारती रविंद्र दुबे रा. फ्लॅट नं. 201, एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि. छ. संभाजीनगर यांना दि. 18 रोजी ताब्यात घेण्यात आलेले होते. परंतु त्यांचा साथीदार अफरोज खान पुर्ण नांव माहित नाही रा. खटखट गेट, ता.जि. छ. संभाजीनगर गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता.

सदर फरार आरोपीचा शोध घेणेकामी  सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, सारिका दरेकर, भगवान धुळे अशांना नेमण्यात आले होते.

पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपी नाव अफरोज याची माहिती काढुन त्याचे पुर्ण नांव निष्प्पन्न केले. दि. 23 रोजी सदर आरोपीचा शोध घेत असतांना तो प्रवरासंगम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदार व व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त झाली. पथकाने प्रवरासंगम या ठिकाणी जावुन सापळा रचुन अफरोज सुलतान खान वय – 45 वर्षे रा. कटकटगेट ता. जि. छ. संभाजीनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे यापुर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांचे सोबत गुन्हा केल्याचे कळविले आहे.

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!