सोनई (जनता आवाज वृत्तसेवा):- शनिशिंगणापूर येथे अमावास्येनिमित्त भरलेल्या यात्रेस शुक्रवार सायंकाळ ते शनिवारपर्यंत पाच लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. वाहन, दर्शनव्यवस्था, आरोग्य, रुग्णवाहिका, सुरक्षा, कोणी हरवले कोणी सापडले, पिण्याचे पाणी याचे नियोजन देवस्थानच्यावतीने करण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळ नंतरच भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली शनिवारी सकाळी गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गट ऑफिस परिसरात, घोडेगाव रस्त्यावरील शनैश्वर रुग्णालय येथे वाहनतळावरच भाविकांना वाहन पार्किंगला ठेवून दोन ते तीन किलोमीटर पायी जाऊन दर्शन घ्यावे लागले.शुक्रवारी दुपारी राकेश कुमार, जयेश शहा व सायंकाळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, सौरभ बोरा व शनिवारी दुपारी किशोर माठा व सायंकाळी आ. शिवाजी कर्डिले यांच्या आरती हस्ते करण्यात आली पद्मश्री पोपटराव पवार, आ. विठ्ठलराव लंघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले
देवस्थानच्यावतीने कार्यकारी अधिकारी जी के दरंदले, अध्यक्ष भागवत बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे व विश्वस्त मंडळाने आलेल्या भाविकांचे स्वागत केले शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.