26.1 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकरी प्रश्नावरील रस्ता रोको यशस्वी , पण रुपेश ढवण यांचे आमरण उपोषण सुरूच शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग

पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा): – कांदा भाववाढ , कांदा निर्यात बंदी उठवावी , शेतकरी कर्ज माफी या व इतर शेतकरी प्रश्नांवर आमरण उपोषणाला बसलेले युवा शेतकरी नेते रुपेश ढवण यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांनी आज रविवार दि . २४ रोजी निघोज गाव बंद ठेवून ३ तास भव्य रस्ता रोको केला , पण युवा शेतकरी नेता रुपेश ढवण यांनी मात्र प्रश्नांची तड लागत नाही , तो पर्यंत आमरण उपोषणाचा निर्धार आजच्या ५ व्या दिवशी कायम ठेवला आहे .

आज रविवारी सकाळी १० वाजता रूपेश ढवण यांची टाळ , पखवाद वाजत व अभंग गात उपोषण स्थळापासून ते ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा मातेचे यथा सांग दर्शन घेतल्यानंतर , निघोज च्या बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांच्या समवेत ३ तास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .

यावेळी महिला शेतकरी यमुनाबाई पांढरकर , दादा वराळ , बाळासाहेब लंके , रामचंद्र सुपेकर , सदाशिव पठारे , आबाजी भुकन , चेअरमन किरण सुपेकर , गणेश पवार व इतरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत , प्रसंगी सरकार वर शाब्दिक आसूड ओढले .

यावेळी हभप पवन महाराज तनपुरे भिकाजी पठारे , दौलत सुपेकर , संदीप वरखडे , राजू लाळगे , अप्पासाहेब वराळ व मोठा जनसमुदाय उपस्थित होता . सुत्रसंचालन अनिलराव लंके यांनी केले .

प्रमुख मनोगत व्यक्त करताना उपोषण कर्ते व शेतकरी नेते रूपेश ढवण म्हणाले की , हे शेतकरी आंदोलन माझ्यासाठी नाही , तर शेतकऱ्यांसाठी आहे , आता नाही , तर कधीच नाही . आज हा रस्ता रोको , थांबविण्यात येत आहे , पण सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय माझे आमरण उपोषण थांबणार नाही . हा उपोषणाचा दुसरा टप्पा असून मी या आधी आमदार , खासदारांच्या आंदोलनाला एवढा जनसमुदाय उपस्थित नव्हता , त्या पेक्षा जास्त जनसमुदाय आजच्या या रस्ता रोको आंदोलनाला उपस्थित आहे . कांद्याला एक दिवस तरी सोन्याचा भाव मिळेल . शेतकरी जगला , तर च सर्व व्यवसाय चालतील , त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माझा हा लढा असाच पुढे ही सुरू राहणार आहे , असा निर्धार ही ढवण यांनी व्यक्त केला . 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ . भास्करराव शिरोळे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत राज्य सरकारवर टीका केली . 

शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शासकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलना कडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली .तर पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे यांनी सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दिलेले आश्वासन न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करत रुपेश ढवण यांच्या या आंदोलनाची दखल घ्यायला हवी असा मुद्दा मांडत , कांदा निर्यात धोरण सुरू करून शेतकऱ्यांना शेतीसाठी कमीत कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे . प्रगतशिल शेतकरी महेंद्र पांढरकर यांनी सरकारचे शेतकऱ्यांच्या बद्दल कसे चुकीचे धोरण आहे , याचा लेखा जोगा मांडला . 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!