17.9 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुंबई हायकोर्टचा मनोज जरांगे पाटील यांना झटका आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई, हायकोर्टाने दिला खारघर किंवा नवी मुंबईचा पर्याय

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे. कोर्टाने या प्रकरणी त्यांना मुंबईबाहेर आंदोलन करण्याची सूचना केली आहे. अशी विश्वासनीय सूत्रातून माहिती मिळाली आहे.

मनोज जरांगे उद्या बुधवारी सकाळी 10 वा. मुंबईच्या दिशेने कूच करत असताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे जरांगे या प्रकरणी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंनी उपोषणाचे हत्यार उपसल्यामुळे राज्य सरकारची मोठी गोची झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले ओएसडी राजेंद्र साबळे यांना आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही जरांगे मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना परवानगीशिवाय आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई केली आहे.

हायकोर्टाने दिला खारघर किंवा नवी मुंबईचा पर्याय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे यांना उपोषण करण्यासाठी खारघर किंवा मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारपुढे खुला आहे. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, या दष्टिकोनातून मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिला आहे.

दुसरीकडे, हायकोर्टाच्या आदेशांनंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आझाद मैदानावर उपोषण का करता येणार नाही? असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. आम्ही कायदा व संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करू. आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार. आम्ही न्यायदेवतेच्या आदेशाचे पालन करू. कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. आमचे वकील बांधव या प्रकरणी कोर्टात जातील. न्यायदेवता सर्वसामान्य जनतेसाठी ते आहे

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!