पानेगांव (जनता आवाज वृत्तसेवा):- मुळा धरणाच्या वरच्या लाभ क्षेत्रात होत असलेल्या पाऊसाने मुळ धरण जवळपास २६ टीमसी पाणीसाठा पुर्ण झालेला असून पाऊसाचा अंदाज घेवून दि. २६ मंगळवार पहाटे दहा क्युसेसने मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत असल्याचे महसूल प्रशासनसह मुळा पाटबंधारे विभागाने सांगितले.
मुळा धरणाच्या खालच्या लाभक्षेत्रासह नगर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस नसल्याने मुळा धरणातून नदीबरोबरच डावा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांबरोबरच लाभ क्षेत्रातील भुजल पातळी वाढ होण्यास मदत होत आहे. पाऊस थांबल्यावर विसर्ग कमी करुन दोन्ही कालव्यांना पुर्ण दाबाने पाणी सोडून त्या परीसरीतील भुजल साठे भरण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाला आदेश द्यावेत. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मुळा धरणातून जायकवाडीत या वर्षात आतापर्यंत जवळपास दोन टीएमसी पेक्षा कमी पाणी सोडण्यात आले असून वरील लाभ क्षेत्रात पडणारा पाऊसावर विसर्ग अवलंबून राहणार आहे.
सायली पाटील
अभियंता मुळा पाटबंधारे विभाग नगर
मुळा धरण जवळपास पुर्ण क्षमतेने २६टीमसी भरले असून मुळानदील केटीवेअर पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाटबंधारे विभागाने आतापासूनच नियोजन करावे
– नानासाहेब जुंधारे
(संस्थापक कार्याध्यक्ष मुळाथडी पाणी आरक्षण कृती समिती)