श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):-येथील सुमित शम्मीकुमार गुलाटी, यांचे के. पी. सुपर मार्केट या दुकानाचे (मॉल) चे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील गल्यातील (ऐशी हजार) रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ७७१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकास गुन्हयाच्या घटनास्थळी पाहणी करुन, तांत्रिक विश्लेषण करत असतांना गुप्त बातमीदाकडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी अभय ऊर्फ किशोर समज केदारे, वय १९ वर्षे, रा. वारुळाचा मारुती नालेगाव ता.जि.अहिल्यानगर, समीर जाकीर सय्यद, वय २० वर्षे, रा. बुरुगाड रोड, जाहागिरदार चाळ, अहिल्यानगर ता. जि. अहिल्यानगर हल्ली रा. शाहुनगर, केडगाव ता. जि. अहिल्यानगर यांनी त्यांच्या साथिदारासह मिळुन केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपीताचा शोध घेवुन त्यांना त्याब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हा हा साथिदार आरोपी नामे अकबर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही, (फरार), अन्सार शेख रा. नालेगाव ता. अहिल्यानगर (फरार) असून आरोपींकडून (एक लाख वीस हजार सहाशे तीस) १,२०,६३० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पो.हे.कों. जयवंत तोडमल, पो.ना. भागवत शिंदे, पो.कॉ. अमोल पडोळे, पो.कों. सागर बनसोडे, पो.कॉ. संभाजी खरात, पो.कों. मच्छिंद्र कातखडे, पो.कों. अजित पटारे, पो.कों. सचिन काकडे, पो.कों. सचिन दुकळे, पो.कों. रामेश्वर तारडे, पो.कों. पांडुरंग चौधरी, पो.कों. गणेश तुपे, म.पो.कों. मिरा सरग आदीनी गुन्हयाचा तपास केला आहे. पुढील तपास पो.ना. भागवत शिंदे हे करीत आहेत.



