लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथील सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील अनिकेत घोलप आणि नोमान पटेल या दोन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी विद्यार्थी असलेल्या अरेबियन कोस्ट कॉन्ट्रॅक्टिंग एलएलसी, दुबई-यूएई या नामांकित कंपनी मध्ये १० लाखांच्या भरीव पॅकेजसह निवड झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब वराडे म्हणाले, सिव्हील विभाग हा एन.बी .ए . नामांकन प्राप्त केले आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून अभियांत्रिकी महाविद्यालयाने परदेशामध्ये शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आजपर्यंत जागतिक पातळीवर असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तेथील नवीन तंत्रज्ञान, तंत्रज्ञानामधील बदल याची माहिती देत त्यांना लागणारे आवश्यक तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले जाते. यामुळे आज जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाने विशेष पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
या विभागाचे प्रा.विकास घोलप आणि प्रा. लक्ष्मण लहामगे यांनी माहिती देतांना सांगितले की,सिव्हील इंजिनिअरिंग विभाग इंडस्ट्रीजची गरज ओळखून, महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीजमध्ये लागणारे तंत्रज्ञानात पारंगत केल्यामुळे ४५ हून अधिक विद्यार्थांची विविध सरकारी उच्च पदांवर स्पर्धा परीक्षांमधून निवड झाली आहे तर या वर्षी शिकत असलेल्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शंभर नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. विभागाकडे पीएच.डी. झालेले वरिष्ठ तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहेत. हा विभाग त्यांच्या चार वर्षांच्या अभ्यासादरम्यान उद्योग गरजेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. विभाग मूल्यवर्धन कार्यक्रम, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि प्रगत तंत्रज्ञानातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय बूट कॅम्प आणि कार्यशाळा, प्री-प्लेसमेंट चर्चा, विविध नामांकित संस्थांना औद्योगिक भेटी आयोजित करतो. विभाग शैक्षणिक वर्षात विविध तांत्रिक कार्यक्रम, सांस्कृतिक आणि खेळांचे आयोजन या सारख्या उपक्रमातून विद्यार्थी परिपुर्ण होत असतो.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद कोळसे यांनी सांगितले की, सध्याच्या जगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही सिव्हिल इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर कोर्स, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, ॲप्टीट्युड ट्रेनिंग घेतो यांचा मोठा फायदा मुलांना होतो.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, प्रा.मनोज परजणे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. अण्णासाहेब वराडे, सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या सिव्हील मधील नवे तंञज्ञान, माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल आणि मंत्री विखे पाटील यांनी सुरू केलेल्या विविध सेवा सुविधांमुळे मला हे यश मिळवता आले. खरंतर माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचण्यामध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. आज खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांना बळ या निवडीमुळे मिळाले असे अनिकेत घोलप यांनी सांगितले.