लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश देत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वाद्यासह ढोल ताशा लेझीम आणि वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचं आगमन करण्यात आगमन झाले.
यावर्षी थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली ही संकल्पना घेऊन संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील , विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा शैक्षणिक समूहाच्या डीजे मुक्त श्री गणेश उत्सव हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे . या माध्यमातून प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये ढोल ताशा लेझीम वेशभूषा यांच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तींचे आगमन आणि श्रींची स्थापना करण्यात आली.
संस्थेच्या माध्यमातून ह्या वर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची ओळख जनतेला व्हावी या उद्देशाने सहकारातून समृद्धीकडे शिक्षणातून विकासाकडे त्याचबरोबर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेल्या थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली ही संकल्पना घेऊन यावर्षीचा गणेश उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये पर्यावरण पूरक शाडू मूर्तीची कार्यशाळा, प्रवरा सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा, राहाता, शिर्डी ,साञळ, आश्वी, लोणी आणि कोल्हार या ठिकाणी परिसरांतील प्राथमिक शाळा, महाविद्यालये विविध यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी यांनी ढोल ताशा, लेझीम, भगवी पताका विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी अशी भव्य दिव्य मिरवणुकीने श्रींचे आगमन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे डॉ. आर. ए. पवार, अशोक पानगव्हाणे, आदींसह संस्थेतील विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आगळावेगळा असा गणेश उत्सव दरवर्षी साजरा केला जातो मागील वर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांपुढे शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. यावर्षी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेणारे व्याख्याने, रांगोळी, आणि पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन प्रवरेच्या शाळा महाविद्यालयांमध्ये करण्यात आले आहे.