लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोणी बुद्रुक येथे २५ व्या वर्षी एक गाव एक गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा बुधवारी उत्साहात करण्यात आली.
सौ.सुशीलाताई व जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील,सरपंच कल्पना ताई मैड, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे,विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे,उपाध्यक्ष नाना म्हस्के, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, सी.एम.विखे, अनिल विखे,लक्ष्मण बनसोडे, ऍड.नितीन विखे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
लोणी बुद्रुक येथे ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून २००१ मध्ये एक गाव एक गणपती सुरू झाला.यावर्षी त्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.ग्रामस्थ,नागरिक,गणेश भक्त यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा आदर्श उपक्रम अखंडपणे सुरू आहे.गणेश उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.