23.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूरमध्ये नशेचे मेफेंटर्मिन औषध विक्री करणाऱ्या परवेज शेखला अटक मेफेटरमाईन औषधाच्या एकुण 16,700/रु. किंमतीच्या 50 बॉटल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूरमध्ये नशेचे मेफेंटर्मिन औषध विक्री करणाऱ्या परवेज शेखला अटक करून मेफेटरमाईन औषधाच्या एकुण 16,700/रु. किंमतीच्या 50 बॉटल जप्त. श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी बजावली आहे.

दि. 27 रोजी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे इसम  परवेज शेख याने कुरिअरव्दारे नशेचे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता मागवले असुन तो दोन वाजेच्या सुमारास ते घेण्याकरीता येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदरची माहिती  उपविभागीय पोलीस अधिकारी  जयदत्त भवर यांना कळवुन त्यांच्या परवानगीने तसेच औषध निरीक्षक सोमनाथ. बा. मुळे, नेम. अहिल्यानगर यांच्याशी संर्पक करुन तात्काळ पोलीस पथकास जिजामाता चौकामध्ये सापळा लावण्यास सांगितला व सदरचा इसम मिळुन येताच खात्री करुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश तपास पथकास दिल्याने तपास पथकाने तात्काळ जिजामाता चौकात सापळा लावला व सदरचा इसम डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे येवुन त्याने सदरचे पार्सल ताब्यात घेताच त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव परवेज जमीर शेख, वय 23 वर्षे, रा. आयडीबीआय बॅक समोर, नेवासा रोड वॉर्ड नं.06, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाच्या ताब्यातुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

16700 / रु.किंमतीचे मेफेंटर्मिन औषधाच्या 10 एम.एल.च्या 50 बॉटल मिळुन आल्या.वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल वरील नमुद आरोपीकडुन जप्त करण्यात आला असुन त्याच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे,  पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव, पोकों. संपत बडे, पोकों.अमोल पडोळे, पोकॉ.सचिन दुकळे, पोकों.संभाजी खरात, पोकॉ.अजित पटारे, पोकॉ.राहुल पौळ, पोकॉ. आजिनाथ आंधळे, मपोकों. मिरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, नेम. अहिल्यानगर यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!