23.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत  कऱ्हेटाकाळी येथे प्रवेश केल्यानंतर सकल मराठा समाजाने भव्य स्वागत  वाहनाच्या प्रचंड लांबलचक  रांगा 

शेवगाव(जनताआवाज वृत्तसेवा):-संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या हजारो मराठ्यांचा गाड्यांचा ताफा पैठणहुन कऱ्हेटाकळी ता शेवगाव मध्ये सायंकाळी ७ च्या सुमारास दाखल झाला त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले हजारो समर्थक उपस्थित होते त्यानंतर खानापूर , दिशेने रवाना झाले .

त्यांच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक गावासह ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या चौका चौकात शेकडो फुट लांबीचे त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते जेसीबीद्वारे त्यांचेवर पुष्प वृष्टी करण्यात आली ताफ्याचा तालुक्यात काऱ्हेटाकळी येथे प्रवेश  झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याच्या मार्गातील कर्हेटाकळी, खानापूर, घोटण, तळणी, शेवगाव शहर, मध्ये नित्य सेवा हॉस्पिटल चौक येथे असंख्य जेसीबीच्या साहाय्याने फुलाची उधळण केली.

येथून रॅली नंतर क्रांती चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान ठिकठिकाणी जेसीबी मधुन पुष्प वृष्टी. करण्यात आली त्यानंतर पावणे नऊ च्या सुमारास पुढील वडूले, सामनगाव, मळेगाव, निंबेनांदूर, ढोरजळगाव या दिशेने रवाना झाले.

मार्गावरील सर्व गावातील ग्रामस्थ, सकल मराठा समाज जरांगे पाटील यांचे भव्य दिव्य स्वागत केले त्याचे तालुक्यात उशिरा आगमन झाले तरी हजारो समर्थक वाट पाहत येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागतासाठी थांबले होते ताफ्या दरम्यान रुग्णवाहिका व वैद्यकीय सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्यात आली होती पिण्याच्या पाण्याची अनेक ठिकाणी सोय करण्यात आली होती.

शेवगाव तालुका डॉक्टर असोसिएशनने रुग्णवाहिके सह औषधोपचाराची व्यवस्था केली होती तसेच मार्गावर कुठेही वाहन नादुरुस्त झाल्यास अथवा पंचर झाल्यास शेवगाव तालुक्यातील फिटर व पंचर दुकानदार मोफत सेवा देण्यात आली.

जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुका अतुरला होता .तसेच यावेळी जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यात शेवगांव तालुक्यातून असंख्य तरुणांसह शेकड्याहून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात सहभागी झाले आहेत

शेवगावचे मुस्लीम बांधवानी जरांगे पाटील यांचे ताफ्याचे स्वागत केले व पाठिंबा दिला तसेच पिण्याच्या पाण्याची सर्व व्यवस्था मुस्लीम बांधवांनी केली होती .

रात्री उशिरा आलेल्या ताफ्यांमध्ये हजारो वाहने कार्यकर्त्यांसह सामील झाल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती मोठ्या रांगा लागल्या होत्या तर रिमझिम पाऊस सुरू असूनही मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!