16.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

टक्केवारी अन् दहशत करण्यासाठी सत्ता नको ,डॉ. सुजय विखे पाटील यांची खा. निलेश लंके यांच्यावर टीका कुकडी कालव्यातून 4 टीएमसी अतिरिक्त पाणी पारनेरला मिळणार

पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा) :- टक्केवारी, दहशत करण्यासाठी सत्ता नको, सत्तेचा वापर विकासकामांसाठी झाला पाहिजे. पठार भागाच्या पाण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून संघर्ष सुरु आहे. पुणे जिल्ह्याबरोबर लढण्याची हिम्मत फक्त विखे पाटील कुटुंबामध्ये आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाण्याचे पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खा. सुजय विखे पाटील यांनी दिले. कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे गुरुवार दि. २८ रोजी कार्यान्वित होणाऱ्या सिंचन योजनेच्या सर्वंक्षणाचा शुभारंभ माजी खासदर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

या सोहळ्यात भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग आणि आमदार काशिनाथ दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी एकूण 9 कोटी रुपयांचा प्रस्तावित निधी असून, त्यातील पहिला टप्पा म्हणून 1.80 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

या निधीअंतर्गत प्रकल्पाचे विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कान्हूर पठार भेटीत दिलेल्या आश्वासनानुसार, पारनेर तालुक्याच्या आवर्षणग्रस्त भागाला पाणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. या योजनेतून शेतकऱ्यांना स्थिर व पर्यावरणपूरक वीजपुरवठा होणार असून, शेती सिंचनासाठी मोठा आधार निर्माण होणार आहे.

याप्रसंगी दादासाहेब सोनावळे, वसंतराव चेडे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, राजाराम एरंडे, नगरसेवक युवराज पठारे, अब्बास मुजावर, विक्रम कळमकर, दत्ता नाना पवार, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सुभाष दुधाडे, सुषमा रावडे, सुधामती कवाद, संदिप वराळ, शिवाजी खिलारी, सखाराम ठुबे, वसंतराव ठुबे, अर्जुन नवले, सुयश वाळूंज, बबन व्यवहारे, कानिफनाथ ठुबे, सुशांत ठुबे, अनिकेत ठुबे, भरत ठुबे, आकाश सोनावळे, संदीप ठुबे, संपत लोंढे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, जे माझी टिंगल करतात किंवा माझ्यावर हसतात ते लोक मला आवडतात. राजकारणात हार जीत  चालू असते. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर काम महत्वाचे आहे. पठार भागाची सिंचन योजना नारळ फोडण्याचा पलीकडे गेली आहे. प्रत्येक वेळेस पश्चिमेकडील मंत्र्यांनी नारळ फोडला, त्यामुळे पठार भाग वंचित राहिला आहे. परंतु विखे पाटील परिवाराने दिलेला शब्द मीच पूर्ण करणार आहे.लोकसभेच्या निवडणुकीत जी चूक केली ती विधानसभेत दुरुस्ती गेली.

आमदार दाते यांचा सारखा शिक्षित आमदार तालुक्याने निवडून दिल्याने योजना मार्गी लागत आहे. डिंभे माणिक डोह बोगदयाचे काम झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम सुरू करण्यात येणार आहे. कुकडी कालव्यातून 4 टीएमसी अतिरिक्त पाणी पारनेरला मिळणार असल्याची माहिती माजी खा. सुजय विखे पाटील यांनी दिली.

ज्या दिवशी मी निवडणूक जिंकली. त्याच दिवशी या पठार भागावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत तालुक्यातील चारही पाणी योजना मार्गी लावण्याचा निश्चय केला. चारही योजनेचा डीपीआर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले. पठार भागांवरील सर्व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ही पाणी योजना अत्यंत महत्व पूर्ण असल्याने ही योजना मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत पूर्ण होणार आहे.

– काशिनाथ दाते, आमदार

कान्हूरच्या इतिहासात एवढ्या प्रमाणात रस्त्यांची कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. तब्बल चार कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे मार्गी लागली आहे, राजकारणासाठी विकास कामे करण्यात काही दुमत नाही. माझ्या जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत पाण्यासाठी लढत राहणार. झेडपी इलेक्शन पर्यंत पाण्याच्या निधीची प्रमा दिली तर मी निवडणूक लढवणारही नाही.

– विश्वनाथ कोरडे, भाजप नेते 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!