संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर फेस्टिव्हलच्या 17 व्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये गणेशाची आरती झाली. आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
त्यानंतर आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की संगमनेर तालुका सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक तालुका आहे. मालपाणी उद्योग समूह आणि राजस्थान युवक मंडळाचे काम मोठे असून यावर्षी 11 वर्षांनी होणारी मिरवणूक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले.
सर्वांचे आभार मानल्यानंतर आमदार अमोल खताळ माघारी निघाल्यानंतर या माथेफिरुणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला. सदर इसमाचे प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ असे नाव असे असल्याचे समजते आहे. उपस्थितांमध्ये 20 मिनिटे गोंधळाचे वातावरण होते. आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.