श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर शहरांमध्ये आज भर दुपारी अडीचच्या दरम्यान शिवाजी रोडवरील गिरमे चौकातच्या जवळील एका चहाच्या दुकानाच्यानजीक दोन गट अचानक आमने-सामने आल्यामुळे मागील वादावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचावाची झाली .
ही बाचाबाची सुरू असताना वार्ड क्रमांक दोनमधील एका तरुणाने आपल्याजवळी गावठी कट्टा काढून समोरच्या व्यक्तीवर रोखला . या कट्ट्यामधून गोळीबार झाल्य परिसरात होत आहे. सदर कट्टा बाळगणाऱ्या या तरुणाला दुसऱ्या गटातील तरुणांनी पकडून बेदम चोप दिला .
या घटनेची माहिती कळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती वायु वेगाने शहरात पसरल्याने दोन्ही गटातील शेकडो तरुण पोलीस ठाण्यात जमा झाले होते. त्यामुळे परिसरामध्ये तणावयुक्त वातावरण होते. या घटनेची पुढील चौकशी पोलिस करीत आहे.