श्रीगोंदा(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीगोंदा शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. पावसाच्या सरी कोसळत असतानाही प्रचंड संख्येने शेतकरी उपस्थित राहून या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात स्थानिक नेत्यांनी आपले विचार मांडताना तालुक्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, तसेच आगामी निवडणुकांची दिशा स्पष्ट केली.
दत्तात्रय पानसरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
घनशाम शेलार यांनी तालुक्यातील आमदारांचा अधिकाऱ्यांवर असलेला दबाव व हुकूमशाही पद्धतीवर थेट नाव न घेता जोरदार टोलाही लगावला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका शंभर टक्के ताकदीने लढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णा शेलार यांनी मागील निवडणुकीत वेगवेगळे लढल्यामुळे फक्त ३०% मतांवर आमदार निवडून आल्याचे सांगत, यापुढे सर्व आदेश मान्य करून एकजुटीने लढण्याचा संकल्प व्यक्त केला.
राजेंद्र नागावडे यांनी भविष्यात अजित पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल असे स्पष्ट केले.राहुल जगताप यांनी गुटका, दूध व पनीर भेसळीचे प्रश्न उपस्थित करत तालुक्यातील १० ते २०% कमिशनवर होणाऱ्या कामांमुळे दर्जाहीन कामे होत असल्याचा आरोप केला. तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन निवडणुका लढवण्याचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की कुकडी, डिंबे माणिकडोह, सिसपे यांसारख्या प्रकल्पांबाबत योग्य निर्णय घेऊ.
शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक राहील.दालमिया सिमेंट प्रकल्प प्रदूषणमुक्त राहील का याची तपासणी केली जाईल.साखर कारखाने अडचणीत आल्यास सरकार मदतीला धावून येईल, परंतु कारखान्याच्या कारभारात जर शंका आली तर चौकशीही केली जाईल.गुंतवणूक करताना राष्ट्रीयकृत बँकांमध्येच करा, योग्य मागण्या आम्ही पूर्ण करू.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना निवडून दिल्यास त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल.यावेळी अजित पवार यांनी महंमद महाराज विषयावर सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याचे नियोजन राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा, राजेंद्र नागावडे, घनशाम शेलार, भगवान पाचपुते व अण्णा शेलार यांनी केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब नाहटा यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवर आमदार संग्राम जगताप, लहू कानडे,काशिनाथ दाते,चंद्रशेखर घुले,अरुण तनपुरे अनिल ठवाल,दादासाहेब औटी, सुधीर खेडकर, अनिल औटी यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
माणिक डोह बोगद्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण हा काही प्रश्न बोगदापाड किंवा भोग पाडा असा नाही त्याला सर्व नियमती करूनच सर्व कामे होतील.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या सभेमध्ये पत्रकार कक्षा मधून घोषणाबाजी करण्यात आली व कांद्याविषयी बोलण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे यांनी केले परंतु याकडे पवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही.